अस्मीचे अधिष्ठातांना निवेदन :२० दिवसांपासून पाणीटंचाई
औरंगाबाद ः गेल्या २० दिवसांपासून कोणत्याही वापरासाठी वसतिगृहात पाणी नाही. साफसफाईकडे दुर्लक्ष होत आहे. कॅन्टीनचे अवाढव्य दर खिशाला कात्री लावत आहे. खोल्या, खिडक्या, दरवाजे दुरुस्तीअभावी निकामी झाले आहेत. तर टेबल खुर्ची पलंग गाद्यांची सुरुवातीपासून वानवा आहे. कुत्र्यांचा वावर वाढला असून, जिमखान्यात यंत्र सामग्री उपलब्ध करून देण्याची मागणी इंटर्न डाॅक्टरांच्या संघटनेने घाटीच्या अधिष्ठातांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अस्मीने दिलेल्या निवेदनात, आजवर शेकडो अर्ज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देऊन झाले आहेत, महाविद्यालय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवते तर सार्वजनिक बांधकाम विभाग महाविद्यालयाकडे यात शेवटी इंटर्न डाॅक्टरांच्या हातात काहीच लागत नाही. यूजी होस्टेल राहण्यायोग्य करून मागण्यांचा गांभीर्याने विचार करुन सुविधा देण्याची मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास इंटर्न आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.