वाळूज महानगर : जन्मदात्या आईनेच पोटच्या दोन मुलांना एका इसमाच्या मदतीने मारहाण करून त्यांना गरम झारीचे चटके दिल्याची धक्कादायक घटना शाळेतील एका शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे शनिवारी उघडकीस आली. आई व त्या इसमास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली आहे. पार्वती शंभू गिरी (रा. खैराक मठिया, ता.रसाडा, जि. बलिया उ. प्रदेश, ह. मु. जयभवानी चौक, बजाजनगर) ही आपल्या रवी ११ वर्षे व राज ९ वर्षे या दोन मुलांसह बजाजनगरात नागेश चव्हाण या इसमासोबत राहते. ती नागेशबरोबर एका कंपनीत कामाला आहे. मुले बजाजनगरातील सनराईज इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात. शनिवारी रवी व राज हे सकाळी शाळेत आले असता त्यांच्या चेहऱ्यावर कशाने तरी चटके दिल्याचे लाल डाग दिसून आले. याविषयी शिक्षिका ठाकरे यांनी विचारपूस केली असता शुक्रवारी आई व तिच्यासोबत राहणारा नागेश यांनी रात्री बेल्टने मारहाण केली. रडत असताना गप्प बसा म्हणून तापलेल्या गरम झारीने तोंडावर व शरीरावर अन्य ठिकाणी चटके दिल्याचे सांगितले. त्यांच्या शरीरावर मारहाणीचे वळ व झारीने दिलेले चटक्याचे लाल डाग स्पष्ट दिसत होते.
जन्मदात्या आईने दिले पोटच्या मुलांना गरम झारीचे चटके
By admin | Published: October 03, 2016 12:28 AM