खुलताबाद तालुक्यातील काटशेवरी फाटा येथे असलेल्या साई मेवाड हॉटेल चालकाने नियमांचे उल्लंघन करून हॉटेल सुरू ठेवली होती. तहसीलदार सुरेंद्र देशमुख व गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांना ही हॉटेल सुरू असल्याचे दिसताच त्यांनी सदर हॉटेलचालकाला सहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. यावेळी ग्रामसेवक संजय खंडागळे, तलाठी अप्पासाहेब सोनवणे, अरुण अधाने, बिट अंमलदार डी. एस. जाधव, आर. बी. भुसारे, पोलीस पाटील भगवान वाहूळ उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : खुलताबाद तालुक्यातील काटशेवरी फाटा येथे असलेल्या साई मेवाड हॉटेल चालकाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.
150421\popatchavan01-0613131313_1.jpg
खुलताबाद तालुक्यातील काटशेवरी फाटा येथे असलेल्या साई मेवाड हॉटेल चालकांने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.