शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

घर एकाचे, विद्युत मीटर मात्र दुसऱ्याच्या नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 3:21 PM

पडेगाव पॉवर हाऊससमोर किरायाने राहणाऱ्या व्यक्तीने बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वत:चे घर दाखवून विद्युत जोडणीसाठी अर्ज केला.

ठळक मुद्दे महावितरण कंपनीच्या छावणी उपकेंद्राच्या अधिकाऱ्यांनीही त्याची खातरजमा न करता तेथे वीज जोडणी दिली.

औरंगाबाद : पडेगाव पॉवर हाऊससमोर किरायाने राहणाऱ्या व्यक्तीने बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वत:चे घर दाखवून विद्युत जोडणीसाठी अर्ज केला. महावितरण कंपनीच्या छावणी उपकेंद्राच्या अधिकाऱ्यांनीही त्याची खातरजमा न करता तेथे वीज जोडणी दिली. विशेष म्हणजे, त्याच घराचा विद्युत पुरवठा काही दिवसांपूर्वीच कायमस्वरूपी खंडित करून मीटर जप्त केले होते.

या संदर्भात शेख मोबीन शेख नूर मोहम्मद यांनी कळविले की, पडेगाव पॉवर हाऊस परिसरात आपले स्वत:चे घर आहे. आपल्या घरात अब्दुल राजीक हा किरायाने राहत होता. राजीकने बनावट बाँडपेपरच्या आधारे आपले घर स्वत:च्या नावावर करून घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर २५ मे २०१८ रोजी छावणी उपकेंद्राच्या कार्यालयात आपल्या घराचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करून मीटर जप्त करावे, असा अर्ज दिला होता. त्यानुसार वीजपुरवठा खंडित करण्यात आला व मीटर जप्त करण्यात आले. 

अब्दुल राजीक या किरायादाराने खोट्या कागदपत्रांच्या आधारे घर बळकावल्याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. याबाबतची कल्पनाही आपण छावणी उपकेंद्राच्या अभियंत्यांना दिली होती. त्याकडे डोळेझाक करीत आपल्याच घरामध्ये अब्दुल राजीकच्या नावे पुन्हा विद्युत मीटर देण्यात आले आहे. 

अब्दुल राजीक हा इलेक्ट्रीशियनची कामे करीत असून, त्याचे छावणी उपविभागातील कनिष्ठ अभियंता जाधव यांच्यासोबत घनिष्ठ संबंध आहेत.या प्रकरणाची अब्दुल राजीक व कनिष्ठ अभियंता जाधव यांची चौकशी करण्याची मागणी, शेख मोबीनने महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजAurangabadऔरंगाबाद