शहरं
Join us  
Trending Stories
1
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
2
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
3
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
4
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
5
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
6
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
7
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
8
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
9
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
10
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
11
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
12
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
13
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
15
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
16
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
17
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
18
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
19
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
20
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी

घरोघरी लक्ष्मीपूजनाने घुमले मांगल्याचे सूर, ज्येष्ठांचा आशीर्वाद घेत शुभेच्छांची देवाणघेवाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 5:29 PM

शहरात सर्वत्र सर्व मंगलमय वातावरण

छत्रपती संभाजीनगर : घरांवर लटकविलेले आकाश कंदिल, विद्युत रोषणाईच्या लखलखाटात न्हाऊन निघालेले शहर... लक्ष्मीपूजनानिमित्त घरोघरी दिसलेला श्रीमंतीचा थाट... मनोभावे लक्ष्मीचे पूजन करून ज्येष्ठांचा आशीर्वाद घेत, एकमेकांना आलिंगन देत दिलेल्या शुभेच्छा... फटाक्यांचा गगनभेदी दणदणाट करीत बच्चे कंपनीने केलेली धमाल आणि सहपरिवार मनसोक्त फराळाचा घेतलेला आस्वाद... रविवारी रात्रीचे हे दिवाळीचे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय ठरले. यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगरात सर्वत्र मंगलमय वातावरण होते.

अंधार दूर करून जीवनाला प्रकाशमान करणारा ‘दीपोत्सव’ रविवारी शहरवासीयांनी धूमधडाक्यात साजरा केला. चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र सीतेसह अयोध्यानगरीत परतले होते, तो हाच दिवस लक्ष्मीपूजन म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. लक्ष्मीची पूजा करून तिचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, धन, धान्य, आरोग्य, समृद्धी प्राप्तीसाठी सर्वांनी सायंकाळी प्रार्थना केली. यानिमित्ताने सर्व परिवार एकत्र आला. घरांच्या दरवाजावर झेंडूच्या माळा लावण्यात आल्या होत्या. संध्याकाळी ७ वाजेपासून शहरात आतषबाजी करण्यास सुरुवात झाली. रात्री ८ ते ९ वाजेदरम्यान तुफान आतषबाजी बघण्यास मिळाली. रॉकेट जेव्हा आकाशात फुटे, तेव्हा जणू काही असंख्य रंगीबेरंगी तारे आपल्या दिशेने येत असल्याचा भास होई.

सायंकाळपर्यंत खरेदी उत्साहातलक्ष्मीपूजनाच्या दोन तास आधीपर्यंत म्हणजे सायंकाळी ४ ते ४:३० वाजेपर्यंत बाजारपेठेत खरेदी उत्साहात सुरू होती. रेडिमेड कपड्यांच्या शोरूममध्ये कपडे खरेदी केले जात होते. मात्र, साड्यांच्या दालनात गर्दी ओसरलेली दिसून आली. लहान मुलांच्या कपड्यांच्या शोरूममध्येही हीच परिस्थिती होती. रविवारी फटाके खरेदी, झेंडू, शेवंती, पूजेचे साहित्य खरेदीवर बहुतेकांनी भर दिला.

मोंढ्यात गादीपूजन, लक्ष्मीपूजनमोंढ्यात तसेच जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्याच्या अडत दुकानांत व्यापाऱ्यांनी सायंकाळच्या मुहूर्तावर गादीपूजन, वहीपूजन, झाडू (लक्ष्मी) पूजन केले. यावेळी खतावणी, गणपती, लक्ष्मी, सरस्वतीचे छायाचित्र असलेली लाल रंगाची वही, कॉम्प्युटरची स्टेशनरी, कोऱ्या नोटांचे बंडल ठेवण्यात आले होते. व्यापाऱ्यांनी दुकानात दिवे लावले व घरी लक्ष्मीपूजन केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDiwaliदिवाळी 2023Diwali Ritualsदिवाळीतील पूजा विधी