शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

पाऊस लांबत चालल्याने प्रशासन हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:10 PM

नियमित पावसाळा सुरू होऊन ११ दिवस उलटले असून, औरंगाबाद विभागात दमदार पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. त्यामुळे दुष्काळ उपाययोजनेत असलेली प्रशासकीय यंत्रणा हवालदिल झाली असून, उपाययोजनेबाबत विभागीय प्रशासनात चिंतन वाढली आहे.

ठळक मुद्देदुष्काळ उपाययोजना : टँकरच्या आकड्यात घट होण्याऐवजी वाढ

औरंगाबाद : नियमित पावसाळा सुरू होऊन ११ दिवस उलटले असून, औरंगाबाद विभागात दमदार पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. त्यामुळे दुष्काळ उपाययोजनेत असलेली प्रशासकीय यंत्रणा हवालदिल झाली असून, उपाययोजनेबाबत विभागीय प्रशासनात चिंतन वाढली आहे.पाऊस लांबल्यामुळे टँकरच्या आकड्यात घट होण्याऐवजी वाढ होत आहे. खरीप हंगाम लांबण्याची शक्यता आहे. विभागात ५६ लाख ४१ हजार ९५ नागरिकांना ३ हजार ५०६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक टँकर औंरगाबाद जिल्ह्यात सुरू आहेत. ११७० टँकरने जिल्ह्यात पाणीपुरवठा सुरू असून, १९ लाख लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्याखालोखाल बीड जिल्ह्यात ९७६ आणि जालना जिल्ह्यात ७०१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. प्रशासनाने ३० जूनपर्यंत टंचाईच्या अनुषंगाने तयारी केली असली, तरी पाऊस लांबला तर यंत्रणेला प्रशासकीय कामे बाजूला ठेवून उपाययोजनांकडे लक्ष द्यावे लागणार आहे.मराठवाड्यात सध्या २४६१ गावे तहानलेली आहेत. या गावांची तहान टँकरच्या पाण्यावरच आहे. आजवर विभागात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत पाऊस झाला असता, तर किमान टँकरचा आकडा तरी कमी झाला असता, अशी प्रतिक्रिया प्रशासनातून उमटत आहे. ५६९९ विहिरी अजूनही अधिग्रहित आहेत.दुष्काळामुळे बदल्यांवर परिणामदुष्काळामुळे बदल्यांवर परिणाम होत आहे. तलाठ्यांच्या बदल्या रोखण्यासाठी गावांतील राजकारण्यांची शिष्टमंडळे तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना भेटून विनंत्या करू लागले आहेत. विद्यमान तलाठ्यांच्या बदल्या आॅक्टोबरपर्यंत तरी करू नका, अशा मागण्या वाढू लागल्या आहेत.हवामानतज्ज्ञ काय सांगतात?हवामानतज्ज्ञ प्रा.किरणकुमार जोहरे यांनी सांगितले, राज्यासह मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात नियमित मान्सून सक्रिय होण्यासाठी १ जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पूर्वमोसमी पाऊस हाच नियमित मान्सून असल्याचा समज होऊ शकतो. हा आभासी मान्सून आहे, त्यामुळे पेरण्यांचे सूत्र शेतकऱ्यांना लांबवावे लागेल.विभागात आजवर किती पाऊस झालामराठवाड्यात ७ जूनपासून आजवर ७७९ मि.मी. या वार्षिक सरासरीच्या तुलनेत १८.७ टक्के पाऊस झाला आहे. किमान ८७ मि.मी. पाऊस विभागात होणे अपेक्षित होते. २.१ टक्के इतका हा पाऊस आहे. १८ जून रोजी ०.११ मि.मी. पावसाची विभागात नोंद झाली आहे. १ जुलैपर्यंत मान्सून सक्रिय झाला नाही तर पावसाचा मोठा खंड निर्माण होईल.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdroughtदुष्काळRainपाऊस