शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

महामार्गालगत जमिनी कशा दाखविल्या? विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 7:20 PM

औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविले अहवाल 

ठळक मुद्देविभागीय प्रशासनाने दखल घेत या प्रकरणात चौकशी करून  जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील करोडी येथील प्रकरण आता चौकशीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे.

- विकास राऊत 

औरंगाबाद : सोलापूर -धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११च्या  लगत जमिनी दाखवून भूसंपादन कोणत्या आधारे केले. जमिनी महामार्गालगत कशा दाखविल्या, याबाबत औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बुधवारी सायंकाळी जारी केले. 

लोकमतने २७ ऑक्टोबर रोजीच्या अंकात ‘महामार्गालगत जमिनी दाखवून वाटले १४० कोटी’ हे वृत्त प्र्रकाशित केले. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी २०११ ते २०२० या काळात कोणत्या भूसंपादन यंत्रणेने संपादन केले, याबाबतही वृत्त प्रकाशित केले. यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. विभागीय प्रशासनाने दखल घेत या प्रकरणात चौकशी करून  जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे. बीड, उस्मानाबाद, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील ६ लाख ६७ हजार ३०५ चौ. मीटर जमिनीसाठी ११६ कोटी ६८ लाख रुपये तर औरंगाबादपासून पुढे काही भागात असाच मावेजा देण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील करोडी येथील प्रकरण आता चौकशीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. करोडी परिसरात जमिनी महामार्गात दाखवून रक्कम वाटली आहे.  हे संपादन करताना कोणता आधार घेण्यात आला. याबाबत विभागीय प्रशासनाने माहिती मागविली आहे. महसूल यंत्रणा, एनएचएआय, नगररचना, भूमीअभिलेख सगळीच यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. 

चौकशीअंती हे मुद्दे समोर येणारएनएचएआयने जे अलाईनमेंट दिले होते, त्यानुसार भूसंपादन करण्यात आले की नाही. जमीन महामार्गाच्या पट्ट्यत आहे की नाही, हे कुणी पाहिले. स्थळपाहणी कुणी केली. विभागात २०१४ मध्ये  महामार्गासाठी सर्व्हे झाला होता. मार्किंग कुणी केली, मोजणी अधिकाऱ्यांनी कसे काम केले. संयुक्त मोजणीनुसार भूसंपादन समितीने अलाईनमेंटनुसार जमीन मिळाली की नाही, हे तपासले की नाही, याची माहिती चौकशीनंतर समोर येईल. जिल्हाधिकारी स्थळपाहणी करीत नाहीत, त्यांच्यापर्यंत खालील यंत्रणेने प्रस्ताव पाठविलेला असतो. त्यामुळे विभागात भूसंपादन समितीने कसे काम केले. हे येणाऱ्या काळात समोर येईल. नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीने दिलेल्या अलाईनमेंटनुसार जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव दिलेले होते. मावेजा उपविभागीय अधिकारी पातळीवर देण्यात आले आहेत.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाfundsनिधीAurangabadऔरंगाबाद