शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

माझे शिक्षण पदवीपर्यंतचे, इंग्रजीचे पेपर कसे तपासू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 12:20 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या बेफिकीर कारभाराचा नमुना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नुकत्याच संपलेल्या पदवी परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी एका महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिकाला बोलावण्यात आले आहे. या लिपिकाने परीक्षा संचालकांना पत्र पाठवून आपले शिक्षण केवळ पदवीपर्यंतचे, इंग्रजीचे पेपर कसे तपासू? असा सवाल उपस्थित करणारे पत्र पाठविले. या प्रकरणात परीक्षा विभाग व महाविद्यालयाने आपली चूक झटकली आहे.

ठळक मुद्देविद्यापीठ : परीक्षा विभागाचे कनिष्ठ लिपिकाला पेपर तपासण्याचे आमंत्रण; तो लिपिक महाविद्यालयाच्या प्राध्यापकाच्या यादीत

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या बेफिकीर कारभाराचा नमुना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नुकत्याच संपलेल्या पदवी परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी एका महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिकाला बोलावण्यात आले आहे. या लिपिकाने परीक्षा संचालकांना पत्र पाठवून आपले शिक्षण केवळ पदवीपर्यंतचे, इंग्रजीचे पेपर कसे तपासू? असा सवाल उपस्थित करणारे पत्र पाठविले. या प्रकरणात परीक्षा विभाग व महाविद्यालयाने आपली चूक झटकली आहे.विद्यापीठाने नुकत्याच घेतलेल्या पदवी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू झाले आहे. यात वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेले नीलेश गणेश घंटे यांना परीक्षा विभागाने २६ मार्च २०१८ रोजी पत्र पाठवले. त्यात प्रोफेसर नीलेश गणेश घंटे असा उल्लेख करीत विद्यापीठाचे कुलगुरू आपणाला पदवी अभ्यासक्रमातील इंग्रजी विषयांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आमंत्रित करीत आहेत. शिवछत्रपती महाविद्यालयात एक ते सहा सत्रांतील आपणाला उत्तरपत्रिका तपासाव्या लागतील. यासाठी आपणाला टीए, डीएसह इतर वेतन, मानधन नियमाप्रमाणे जागेवरच देण्यात येईल. विद्यापीठ कायद्यानुसार उत्तरपत्रिका तपासणे आपणास बंधनकारक असल्याचे या पत्रात म्हटले आहे. हे पत्र मंगळवारी (दि. ३) हाती पडल्यानंतर अवाक् झालेल्या नीलेश घंटे यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांना तात्काळ मेलद्वारे पत्र पाठवले. यात त्यांनी ‘आपण कनिष्ठ लिपिकपदावर कार्यरत असून, माझे शिक्षण वाणिज्य शाखेच्या पदवीपर्यंत झालेले आहे. तरी आपल्या कार्यालयाकडून उत्तरपत्रिका तपासणीसाठी पत्र प्राप्त झाले आहे. माझे शिक्षण बघता मी इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्यास पात्र आहे का? मार्गदर्शन करावे,’ असा सवाल केला, कॉलेजने दिलेल्या माहितीनुसार नीलेश घंटे यांचा प्राध्यापक म्हणून उल्लेख असल्याचे परीक्षा विभागाने स्पष्ट केले.......विद्यापीठाने इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी माझ्या नावाने पत्र पाठविले. या पत्रात जर आपण उत्तरपत्रिका तपासण्यासाठी न आल्यास विद्यापीठ कायद्यानुसार आपणावर कारवाई करण्यात येईल, असा उल्लेख आहे. यामुळे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पात्र आहे का? असे मार्गदर्शन परीक्षा विभागाच्या मेलवर पत्र पाठवून विचारले.- नीलेश घंटे, कनिष्ठ लिपिक, विनायकराव पाटील महाविद्यालय, वैजापूर

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादexamपरीक्षा