शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

पराभवाचे दु:ख कसे विसरू; चुकले असेल तर क्षमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 11:40 PM

भाजपने निवडणुकीत किती साथ दिली हे माहिती आहे. पराभवाचे हे दु:ख मी सहन करू शकत नाही. मी एवढी समाजसेवा केली. तरीही काही पदाधिकारी, शिवसैनिकांनी काम केले नाही. माझे काही चुकले असेल तर मला क्षमा करा, असे भावनिक आवाहन शिवसेना नेते माजी खा.चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी केले.

ठळक मुद्देसंघटनेत फेरबदलाचे संकेत : भाजपसह शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना फटकारले

औरंगाबाद : भाजपने निवडणुकीत किती साथ दिली हे माहिती आहे. पराभवाचे हे दु:ख मी सहन करू शकत नाही. मी एवढी समाजसेवा केली. तरीही काही पदाधिकारी, शिवसैनिकांनी काम केले नाही. माझे काही चुकले असेल तर मला क्षमा करा, असे भावनिक आवाहन शिवसेना नेते माजी खा.चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी केले.शिवसेनेच्या मराठवाडा शाखा स्थापनेच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त ते सिडको नाट्यगृहात बोलत होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे, आ. संजय शिरसाट, विनोद घोसाळकर, आ. मनीषा कायंदे, महापौर नंदकुमार घोडेले आदींची यावेळी उपस्थिती होती. खैरे यांनी २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पहिल्यांदाच शिवसेनेच्या व्यासपीठावरून अंत:करणातील दु:ख जाहीरपणे व्यक्त केले.खैरे म्हणाले, मी चार वेळा खासदार झालो, कुणाचे नुकसान केले. कुणाला तिकीट मिळाले नाही म्हणून माझ्याबाबत नाराजी ठेवायला नको होती. मी निवडणूक जिंकणार. भाजपसोबत असो किंवा नसो हे पक्षप्रमुखांना ठामपणे सांगितले होते. ही शेवटची निवडणूक होती माझी; परंतु काही नतद्रष्ट लोकांना मी संपून जावे, असे वाटत होते. माझ्याकडे काहीही संपत्ती नाही. तरीही माझ्याविरोधात अफवा पसरवितात. माझी काय चूक झाली. (हर्षवर्धन जाधव यांचे नाव न घेता) खैरे म्हणाले, तरीही ट्रॅक्टरवर बसून गेले कशासाठी, जो बापाला, आईला मारतो, बायकोला मारतो. ती पोलिसात तक्रार करायला गेली होती. मला सांगायचे असते, तुम्ही उभे राहू नका. आता दोन समाजात संघर्ष उभा राहिला आहे. मला जे मतदान मिळाले, ते हिंदुत्ववादी आहे. एवढे होऊनही ट्रॅक्टर आणि भाजपवाल्यांना माफ करू या, असे पक्षप्रमुखांना बोललो. असेच भांडत राहिलो तर वंचिताचा विजय होईल. आता संघटनेत फेरबदल करावाच लागेल, याबाबत पक्षप्रमुखांना बोललो आहे.माझा कोणताही गट नाही. मध्य आणि पूर्वमध्ये काय स्थिती आहे ते पाहा. फक्त तिकीट पाहिजे आम्हाला, हिंदू मतदान कमी होत आहे. मतदान वाढले तर विजय होईल. मी मतदारांची माफी मागतो. तो (खा. इम्तियाज जलील यांचे नाव न घेता) कधी आला का आपल्या वसाहतींमध्ये, आम्ही कधी मुस्लिम बांधवांना हाकलले आहे का? असा सवाल करीत ते म्हणाले, माझा शिवसैनिक माझ्यावर नाराज झाला. माझे काय चुकले? शिवसैनिकांनी काम करायला पाहिजे होते. कुटिल कारस्थान करून भगवा खाली आणला. मी मंत्री होणार होतो, औरंगाबादला मिळणारा मान गेला. मतदानाच्या पोलचिटदेखील शिवसैनिकांनी वाटल्या नाहीत. ज्यांनी कुटिल कारवाया केल्या त्यांचे ईश्वर भले करो. राज्यात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदेपेक्षा माझ्या पराभवाची चर्चा जास्त आहे. एनएच २११ प्रकल्प मी आणला, रेल्वेचे पाच प्रकल्प मंजूर केले, डीएमआयसी आणली, तरीही विकास केला नाही, असा आरोप होतो. आता डीएमआयसीमध्ये काहीही येणार नाही. दोन उद्योग येथून निघून गेले आहेत. नगरसेवक व शाखाप्रमुखांचे भांडण, महिला आघाडीचे भांडण हे असे करू नका. गटबाजी करून आता चालणार नाही. यावेळी घोसाळकर, आ.कायंदे यांनी मनोगत व्यक्त केले. पालकमंत्री शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील पक्षसंघटनांची माहिती दिली.पाप केले असेल तर माफ कराह.भ.प.कडे पाहून दु:ख वाटते. तुम्ही त्या ठिकाणी सप्ताह करतात. मी म्हणणार नाही त्यांची दुकानदारी चालते. ह.भ.प.वर दडपण आणले, त्यांना हिंदुत्वावर बोलू दिले गेले नाही. आम्ही जी काही मदत करतो, ती महत्त्वाची असते, त्यावर तुमचा सप्ताह चालतो. ह.भ.प. वर संकट आले तरी ते बोलत नाहीत. ज्यांना-ज्यांना मोठे केले, ते माझ्या विरोधात गेले. याबाबत मला एकदा गोपीनाथ मुंडेदेखील बोलले होते की, खैरे आपले मीठ आळणी आहे काय? मी काही पाप केले असेल, बोललो असेल तर मला माफ करा, असे खैरे म्हणाले. धनगर समाजदेखील वंचित सोबत गेला. इतर जातीदेखील जाण्याची शक्यता आहे, असे भाकीतही त्यांनी व्यक्त केले.३५ व्या वर्धापन दिनी शिंदे मुख्यमंत्री३५ व्या वर्धापन दिनी एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असतील, असे भाकीत खैरे यांनी केले. खैरेंचे हे वक्तव्य पक्षातील अंतर्गत चर्चेला धरून होते की, आगामी काळातील युतीच्या राजकारणावर होते. यावरून राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.शिवसेना जास्त दिवस टिकणार नाहीशिवसेना जास्त दिवस टिकणार नाही, असे खळबळजनक वक्तव्य माजी आ. प्रदीप जैस्वाल यांनी मनोगत व्यक्त करताना केले. गाडीत फिरणाऱ्यांना पदे वाटल्यानंतर पक्षाचे काय होणार, असा टोलाही त्यांनी लगावला.चोमड्यांमुळे पराभव झालालोकसभा निवडणुकीत खैरेंचा नाहीतर शिवसेनेचा पराभव झाला आहे. चोमडेपणा करणाऱ्यांमुळे हा पराभव झाला असून, त्यांना कशाची मस्ती होती हे समजले नाही, असे आ.संजय शिरसाट म्हणाले.दोन्ही जिल्हाप्रमुखांना बोलू दिले नाहीजिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी यांना मेळाव्यात बोलू दिले नाही. ज्या काही मोजक्या नेत्यांनी भाषण केले, त्यामध्ये जिल्हाप्रमुखांना बोलू न दिल्यामुळे उपस्थित शिवसैनिक व पदाधिकाºयांच्या भुवया उंचावल्या. त्यातच खैरे यांनी संघटनेत फेरबदल करण्याचे संकेत दिल्यामुळे कुजबूज सुरू होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना