शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

रक्ताचे नाते निष्ठूर कसे? छत्रपती संभाजीनगरात १०४, तर जिल्ह्यात आढळले ४१ बेवारस मृतदेह

By सुमित डोळे | Published: January 19, 2024 11:16 AM

मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिस साधारण ६ ते ८ दिवस वाट पाहतात.

छत्रपती संभाजीनगर : माणूस प्रगत होत असतानाच दुसरीकडे कौटुंबिक वाद, जगण्याच्या बदललेल्या पद्धती, मतभेदांतून नात्यांमधला गोडवा हळूहळू कमी होत आहे. एकत्र कुटुंब पद्धती संपत असून, दूर गेलेल्या नात्यांमधला संपर्कदेखील कमी होत आहे. अनेकदा रक्ताच्या नात्यातील व्यक्ती बेपत्ता झाल्याची, मृत्युमुखी पडल्याची दखलदेखील घेतली जात नाही. गेल्या वर्षभरात शहर, जिल्ह्यात एकूण १४५ बेवारस मृतदेह आढळले. जिवंतपणीच कुटुंबाने दूर केलेल्या व्यक्तींची मृत्यूनंतरदेखील हेळसांड होते. त्यांच्या कुटुंबाचा शोध घेण्यापासून अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी मात्र पोलिस विभाग प्रामाणिकपणे पार पाडतो.

कोणत्या महिन्यात किती अनोळखी मृतदेह आढळले ?महिना             अनोळखी मृतदेह (शहर)जानेवारी             ५फेब्रुवारी             १३मार्च                        ६एप्रिल             ५मे                         ११जून             ७जुलै             १२ऑगस्ट             ८सप्टेंबर             ८ऑक्टोबर             १३नोव्हेंबर             ८डिसेंबर             ८एकूण             १०४

ग्रामीण भागात प्रमाण कमीशहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मात्र अनोळखी मृतदेह आढळण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षाही कमी आहे. २०२३ मध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकूण ४१ मृतदेह आढळले. यात सर्वाधिक मे महिन्यात ११, जूनमध्ये ७ व डिसेंबरमध्ये सहा मृतदेह आढळले.

७५ टक्के मृत्यू अनैसर्गिकचशहरात आढळलेल्या १०४ मृतदेहांपैकी ७९ मृत्यू हे अनैसर्गिक होते. ग्रामीण भागात ४१ पैकी ३३ अनोळखी व्यक्तींचे मृत्यू अनैसर्गिक निष्पन्न झाले.

काय केले जाते या अनोळखी मृतदेहांचे?अनोळखी मृतदेह आढळल्यानंतर मृत्यूच्या कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदन केले जाते. पोलिस शासकीय संकेतस्थळ, माध्यमांद्वारे ती माहिती प्रसिद्ध करतात.

किती दिवस पाहिली जाते वाट ?मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिस साधारण ६ ते ८ दिवस वाट पाहतात. सामान्यत: रेल्वे अपघातात ओळख पटविण्यात अडचणी येतात. अन्य घटनांमध्ये कुटुंबीय सापडतात. मृतदेह कुजण्याच्या अवस्थेत असल्यास तत्काळ अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यसंस्कारासाठी सामाजिक संस्थांना आवाहन केले जाते, तर काही प्रसंगांत पोलिस अनुदानातूनदेखील ते पार पाडले जाते, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले.

घाटी रुग्णालय परिसरात सर्वाधिक मृतदेहशहरात आढळलेल्या अनोळखी मृतदेहांपैकी ३८ पेक्षा अधिक मृतदेह एकट्या घाटी रुग्णालयाच्या परिसरात आढळले. उपचारांसाठी आणल्यानंतर कुटुंबीय रुग्णांना तसेच सोडून जातात. त्यामुळे येथेच सर्वाधिक मृतदेह आढळत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद