छत्रपती संभाजीनगर : शिवभोजन थाळीमुळे अनेक गरिबांचे पोट भरते. अनेक जिल्ह्यांत केंद्रचालकांना वेळेवर अनुदान मिळत नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मात्र तशी तक्रार सध्या तरी नाही, असे जिल्हा पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे असले तरी केंद्रचालकांना मात्र चार महिन्यांचे अनुदान मिळाले नाही. महागाईच्या तुलनेत मिळणारे अनुदान वाढले पाहिजे, अशी मागणी मात्र जोर धरत आहे.
दहा रुपयांत जेवणगोरगरीब, सर्वसामान्य लोक व मजुरीवर पोट असलेल्या लोकांची सोय व्हावी, हा चांगला हेतू ठेवून उद्धव ठाकरे यांच्या तत्कालीन सरकारने ही शिवभोजन थाळी योजना सुरू केली. सध्याही ती सुरू आहे. एका थाळीत दोन पोळ्या, एक भाजी व वरण-भात असा समावेश आहे. अवघ्या दहा रुपयांत ही थाळी मिळते.
जिल्ह्यात ८३ केंद्रेछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या एकूण ८३ शिवभोजन थाळी केंद्रे आहेत. पूर्वी ही संख्या ५७ होती. अशात आणखी केंद्रांना मंजुरी दिल्याने ती ८३ झाली आहे.
दररोज सात हजार लोकांच्या जेवणाची सोयदररोज जिल्ह्यात सात हजार थाळ्या खाल्ल्या जातात. सात हजार गरिबांच्या जेवणाची सोय होते.
प्रत्येक थाळीमागे २५ व ३५ रुपयांचे अनुदानप्रत्येक थाळीमागे ग्रामीण भागात ३५ रुपये व शहरी भागात ४० रुपया याप्रमाणे अनुदान दिले जाते.
सहा महिन्यांपासून अनुदान मिळेनाछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनुदान मिळत नसल्याची तक्रार नाही. ते वेळेवर दिले जाते, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी दिली. पण काही शिवभोजन थाळी केंद्रचालकांनी आणखी चार महिन्यांचे अनुदान मिळालेले नाही, अशी तक्रार केली आहे.
महागाईमुळे ५० रुपयांतही परवडेनासध्या जे अनुदान मिळते, ते वाढवण्याची गरज आहे. महागाई कमी होण्यापेक्षा वाढतच आहे. त्यामुळे सध्या मिळत असलेल्या अनुदानात वाढ झालीच पाहिजे. तोपर्यंत मिळणारे अनुदान तरी वेळेवर मिळायला पाहिजे, असे नाव न छापण्याच्या अटीवर शिवभोजन थाळी केंद्र संचालकांनी सांगितले.
अनुदानाचे पैसे दिवाळीतही मिळाले नाहीतसेवाभाव मानून आम्ही शिवभोजन थाळी केंद्र चालवतो. पण अनुदानाचे पैसे दिवाळीतही मिळाले नाहीत. सहा महिन्यांनी अनुदान मिळाले पण ते केवळ दोन महिन्यांचेच. चार महिन्यांचे बाकी आहे.- टीव्ही सेंटर परिसर, जळगावरोडवरील व मयूर पार्कवरील केंद्रचालक