शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : जेलमध्ये सुपारी, ४ आठवडे रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या...; सिद्दिकी हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे
2
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
3
भीषण! गाझामधील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; लहान मुलांसह २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
छ. संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्तांच्या मुलाने आयुष्य संपविले; आई - बाबांसाठी आरशावर लिहिली नोट
5
मारेकरी येऊन गेले होते सिद्दीकींच्या कार्यालयात, ...अन् फटाक्यांच्या आवाजात साधला नेम
6
जयशंकर पोहोचण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात; पाकिस्तानात दंगे भडकले
7
अंबानी कुटुंबीय १५००० कोटींच्या अँटिलियातील कोणत्या मजल्यावर राहतं माहितीये, कोणाला येण्याची परवानगी?
8
बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या धर्मराजचा बनाव उघड; समोर आली महत्त्वाची माहिती
9
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : एक आरोपी म्हणाला, मै 17 साल का हूँ...! त्या आरोपीचे वय २१, १९, की १७?
10
भौम प्रदोष: ‘असे करा’ व्रत, महादेव होतील प्रसन्न; मंगळ दोषातून दिलासा, हनुमंत करतील कृपा
11
बाबा सिद्दीकी हत्येच्या कटाचे पुणे ‘कनेक्शन’
12
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
13
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
14
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
15
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
16
एकत्र फोटोमुळे आरोपींची ओळख पटवण्यात आले यश
17
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
18
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
19
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
20
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार

वीज बिल कसे भरू? आधी मीटर बदलून द्या साहेब ! मीटर बदलून हवे असल्यास काय कराल?

By साहेबराव हिवराळे | Published: November 10, 2023 3:29 PM

वाढीव बिल आले की, वाद निर्माण होऊन एक तर महावितरणला नुकसान, नाही तर वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो

छत्रपती संभाजीनगर : ग्राहकांच्या वीज वापराचे अचूक देयक, हे वीज ग्राहकांसोबतच महावितरणसाठीही लाभकारक आहे. त्यामुळेच अचूक बिलिंगला महावितरणकडून प्राथमिकता मिळते. नादुरुस्त मीटरमुळे ग्राहकांना मनस्ताप, तर महावितरणला नुकसान सहन करावे लागते. मीटर बंद, तुटलेला डिस्प्ले, नादुरुस्त मीटरमुळे वीज वापराची कमी-अधिक प्रमाणात नोंद या कारणांमुळे ग्राहकांचा अचूक वीज वापर नोंदविला जात नाही.

वाढीव बिल आले की, वाद निर्माण होऊन एक तर महावितरणला नुकसान, नाही तर वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळेच महावितरणने नियमित आणि अचूक बिलिंगला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक त्या सुधारणा केल्या आहेत.

मीटर खराब असल्याच्या महिनाभरात २५ ते ३० तक्रारीजिल्ह्यात मीटर जळाल्याच्या व नादुरुस्त झाल्याच्या दरमहा सरासरी २५ ते ३० तक्रारी असतात. रोज प्रत्येक तक्रारीची नोंद घेऊन तक्रारी एक-दोन दिवसांत सोडवल्याचा महावितरण दावा करते.

मीटर बंद असल्याच्या तक्रारीमीटर नादुरुस्त झाल्याबाबत ग्राहकांनी नोंदवलेल्या तक्रारींची पडताळणी करून तक्रारीत तथ्य आढळल्यास मीटर बदलून देण्यात येते. मंजूर भार कमी-जास्त करण्याच्या मागणीप्रमाणे आवश्यकतेनुसार मीटर बदलले जाते.

त्वरित मिळेना मीटर

दोन दिवसांत मीटर बदलून मिळते, असे सांगितले जाते. परंतु, कारवाई आणि कामकाजात होणारे अडसर पाहता बहुतांश वेळी मीटर बदलण्यासाठी विलंब होत आहे. त्वरित मीटर मिळत नसल्याची ओरड आहे.मीटर मिळण्यात अडचणी काय?

मीटर बदलून हवे असल्यास काय कराल?मोबाइल ॲपवर किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयात तक्रार नोंदवता येते. या तक्रारींची पडताळणी करून तातडीने मीटर बदलण्याचा दावा महावितरण करते.

अचूक वीजबिलामुळे ग्राहकांच्या तक्रारी व त्यातून निर्माण होणारा असंतोष; या दोन्ही बाबी टाळल्या जातात. ग्राहक समाधानी व महावितरणलाही वितरित केलेल्या विजेचा अचूक परतावा, यात मीटरवरील अचूक वीजमापन महत्त्वपूर्ण ठरते. नादुरुस्त अथवा बंद मीटरवर महावितरणचे लक्ष असतेच; शिवाय तक्रारी असल्यास संबंधित ग्राहकांनी तातडीने संपर्क साधावा.- महावितरण अधिकारी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण