शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

काम होणार तरी कसे?; औरंगाबाद महानगरपालिकेचे साडेतीन वर्षांत सात आयुक्त बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 7:16 PM

सात आयुक्त बदलून गेले, मात्र शहरातील कचऱ्याच्या समस्येवर कुणालाही कायमस्वरूपी तोडगा काढता आला नाही. 

ठळक मुद्देमहापालिकेच्या प्रशासकीय कारभारात सर्वाधिक आयुक्त मागील साडेतीन वर्षांत बदलून गेले. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची इच्छाशक्तीच्या अभावी शहरातील कचरा समस्या सुटू शकलेली नाही

औरंगाबाद : महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात सर्वाधिक आयुक्त मागील साडेतीन वर्षांत बदलून गेले. सात आयुक्त बदलून गेले, मात्र शहरातील कचऱ्याच्या समस्येवर कुणालाही कायमस्वरूपी तोडगा काढता आला नाही. 

शहराला कचऱ्यात लोटण्यास कोण दोषी आहे. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची इच्छाशक्तीच्या अभावी शहरातील कचरा समस्या सुटू शकलेली नाही, असे म्हणावे लागेल. तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन यांच्या काळात कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला. पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या राजकारणात त्यांच्यावर अविश्वास ठराव आणल्यानंतर सुनील केंद्रेकर यांच्याकडे प्र्रभारी पदभार देण्यात आला. केंद्रेकर यांच्या बदलीनंतर ओम प्रकाश बकोरिया यांची मनपा आयुक्तपदी बदली करण्यात आली. पालिकेतील राजकीय गदारोळात त्यांचीही बदली झाल्यामुळे कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी त्यांनाही खूप काही करता आले नाही. त्यांची बदली झाल्यानंतर डी. एम. मुगळीकर यांच्याकडे मनपा आयुक्तपदाची जबाबदारी आली. त्यांना एक वर्षाचा कालावधी मिळाला. त्या काळात नारेगाव-मांडकी येथील दोन वेळा आंदोलने झाली. 

दुसऱ्यांदा १६ फेबु्रवारी २०१८ पासून आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांची एका महिन्यातच बदली झाली. त्यांची बदली झाल्यानंतर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे मनपा आयुक्तपदाचा पदभार आला. राम यांनी कचरा समस्या सोडविण्यासाठी भरपूर ठिकाणी जागा शोधण्याचा प्रयत्न केला. सेंट्रल नाका येथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु त्यांचीही पुण्याला बदली झाली. राम यांची बदली झाल्यानंतर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे महिनाभरासाठी मनपा आयुक्तपदाचा पदभार आला. त्यांनी पालिकेच्या कचरा समस्येत काहीही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला नाही. दरम्यान रुजू व्हावे की न व्हावे, या विवंचनेत अडकलेले डॉ.निपुण विनायक यांनी पालिका आयुक्तपदाचा पदभार घेतला. त्यांच्या कार्यकाळात कचऱ्याची समस्या सुटावी ही शहरवासीयांची अपेक्षा आहे. 

राजकीय इच्छाशक्तीचे बळीआयुक्त प्रकाश महाजन यांच्यावर अविश्वास आणल्यामुळे त्यांची बदली करण्यात आली. तर ओम प्रकाश बकोरिया यांच्याबाबतीतही राजकीय दबावतंत्र वापरून बदली केली गेली. आयुक्त डी. एम. मुगळीकर यांना कचऱ्याचे प्रकरण भोवले. त्यामुळे त्यांची बदली झाली. साडेतीन ते चार वर्षांत सात मनपा आयुक्तांपैकी तीन प्रभारी आणि चार नियमित बदली होऊन येतात आणि जातात. परंतु शहराच्या समस्या तशाच आहेत. प्रशासन आॅक्सिजनवर असल्याप्रमाणे काम करीत असल्यामुळे ‘शहराचा कचरा’ झाला आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न