शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
3
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
4
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
5
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
6
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
7
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
8
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
9
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
10
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
11
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
12
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
13
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
14
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
15
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
16
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
17
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
18
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
19
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
20
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी

वर्षभर कसे पुरेल पाणी? पावसाळा संपता संपताच मराठवाड्यात जलसाठा तळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 11:54 AM

दुष्काळाचे घोंगावते संकट, सर्वाधिक पाणीपुरवठा योजना लघु आणि मध्यम प्रकल्पांवर अवलंबून

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीच्या जेमतेम ८५ टक्के पाऊस पडला. त्यातही नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यावर अधिक आभाळमाया राहिल्याने अन्य सहा जिल्ह्यांवर जलसंकट घोंगावते आहे. या जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पात आजघडीला केवळ ३१ टक्केच जलसाठा उरला आहे.

नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील लहान, मोठे आणि मध्यम धरणांतील जलसाठा ३१ ते ५० टक्के दरम्यान आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६ मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पात केवळ २६ टक्के जलसाठा आहे. जालना जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पात २२ टक्के, बीड जिल्ह्यातील १६ मध्यम धरणात ४२ टक्के, लातूरमधील ८ प्रकल्पात २८ टक्के, धाराशिवमधील १७ प्रकल्पात १६ टक्के, तर नांदेड जिल्ह्यातील ९ प्रकल्पांत ६१ टक्के आणि परभणी जिल्ह्यातील २ प्रकल्पात २५ टक्के जलसाठा आहे. याचप्रमाणे मराठवाड्यातील ७५० लघु प्रकल्पांतील जलसाठ्याची स्थितीही चिंताजनक आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९८ लघु प्रकल्प असून, यामध्ये २८ टक्के, जालन्यातील ५७ प्रकल्पात ६ टक्के, बीडमधील १२६ लघु प्रकल्पात केवळ २३ टक्के, लातूर १३४ लघु पाटबंधारे धरणात २८ टक्के, धाराशिव जिल्ह्यातील २०४ लघु प्रकल्पात १७ टक्के जलसाठा आहे. नांदेड ८०, तर परभणी जिल्ह्यातील २२ प्रकल्पात अनुक्रमे ९८ टक्के व १४ टक्के पाणीसाठा आहे. हिंगोली जिल्ह्यातील २७ प्रकल्पांत आज ८६ टक्के जलसाठा असल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडून मिळाली.

सर्वाधिक पाणीपुरवठा योजना लघु आणि मध्यम प्रकल्पांवर अवलंबूनमराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पात आज केवळ १७ टक्के जलसाठा उरला आहे. पावसाळा संपत असतानाच ही स्थिती असल्याने आगामी काळात धाराशिव जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

१५ ऑक्टोबरला निर्णय अपेक्षितमराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पात आज केवळ ४८ टक्के जलसाठा आहे. समन्यायी पाणीवाटप निकषांनुसार दरवर्षी १५ ऑक्टोबरला जायकवाडी प्रकल्पात किमान ६५ टक्के पाणीसाठा असावा. जायकवाडीच्या उर्ध्व भागातील धरणांमध्ये आज ९० ते ९५ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आहे. त्यामुळे या प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यासाठी कडाच्या अधिकाऱ्यांनी आकडेमोड सुरू केली आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद