शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
4
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
5
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
6
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
7
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
8
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
9
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
11
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
12
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
13
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
14
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

HSC Result :'...तरीही ९६६ विद्यार्थी नापास'; औरंगाबाद विभागाचा बारावीचा निकाल ९९.३४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2021 7:11 PM

HSC Result 2021 Aurangabad Board : यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बारावी परीक्षा रद्द करून अंतर्गत मुल्यमापनाद्वारे निकाल तयार करण्यात आला.

ठळक मुद्देअंतर्गत मुल्यमापनाद्वारे जाहीर केला निकालराज्यात औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी मागील वर्षाच्या तुलनेत ८.९७ टक्क्याने जास्त

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १२ वी परीक्षेचा (HSC Reslut 2021 ) ऑनलाईन निकाल मंगळवारी दुपारी जाहीर करण्यात आला. औरंगाबाद विभागाचा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत ८.९७ टक्क्याने जास्त लागला असून ९९.३४ टक्के विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहेत. यंदाही निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. ( 12th standard result of Aurangabad division is 99.34 percent) 

यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बारावी परीक्षा रद्द करून अंतर्गत मुल्यमापनाद्वारे निकाल तयार करण्यात आला. यावर्षी बारावीच्या परीक्षेत प्रवीष्ठ झालेल्या १ लाख ४६ हजार ७२६ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ४५ हजार ७६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. औरंगाबाद विभागाचा निकाल ९९.३४ टक्क़े एवढा लागला आहे. ९६६ विद्यार्थी अनुतिर्ण झाले आहेत. या वर्षी १२ वी परीक्षेच्या निकाल तयार करताना अंतर्गत मुल्यमापनामध्ये इयत्ता १० वी व ११ वीचे प्रत्येकी ३० टक्के आणि १२ वीचे ४० टक्के अंतर्गत गुणांचा समावेश करण्यात आला आहे. या परीक्षेत ९९.८८ टक्के मुली, तर ९९.८१ मुले उत्तिर्ण झाले असून मुलांच्या तुलनेत ०.३८ टक्के जास्त मुली उत्तिर्ण झाल्या आहेत.

शाखा निहाय निकालविज्ञान शाखेचा ९९.२२ टक्के, वाणिज्य शाखेचा ९९.९० टक्के, कला शाखेचा ९९.८४ टक्के आणि एचएससी व्होकेशन अभ्यासक्रमाचा निकाल ९४.३६ टक्के एवढा लागला आहे.

कला शाखेचा निकाल वाढलाविज्ञान शाखेचा मागील वर्षीचा निकाल ९६.९३ टक्के लागला होता, तर यावर्षी ९९.४५ टक्के लागला म्हणजेच २.५२ टक्क्यांनी निकाल जास्त लागला आहे. कला शाखेचा मागील वर्षीचा निकाल ८२.६३ टक्के लागला होता तो यावर्षी ९९.८३ टक्के म्हणजेच १७.२० टक्क्यांनी जास्त लागला आहे. वाणिज्य शाखेचा मागील वर्षीचा निकाल ९१.२७ टक्के लागला होता. तर, यावर्षी ९९.९१ टक्के निकाल जाहीर झाला आहे. म्हणजेच ८.६४ टक्क्यांनी निकाल जास्त लागला आहे.

जिल्हा- प्रविष्ट विद्यार्थी- उत्तीर्ण विद्यार्थी- टक्केवारी- औरंगाबाद- ५३४४७ -५३१९६, ९९.५३ टक्के- बीड - ३५०२८ -३४७३९ -९९.१७ टक्के-परभणी -१९६३१- १९५१० - ९९.३८ टक्के-जालना - २७७३९ -२७४५४ उत्तीर्ण - ९८.१७ टक्के- हिंगोली - १०८८१ -१०८६१ उत्तीर्ण - ९९.८१ टक्के

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थी