औरंगाबाद : ढोल ताशे आणि गुलालाची उधळण करीत हजारो भाविकांनी गजानन महाराज मंदिर ते सेव्हन हिल रस्त्यांवर गणेशमूर्तींची उत्साहात खरेदी केली. या रस्त्यांवर दोन्ही बाजूने गणेश मूर्ती, पूजेची साहित्य, सजावटीचे साहित्य विक्री करणारी दुकाने मोठ्या संख्येने लागली होती. गर्दीत पाकिटमारी रोखण्यासाठी जवाहरनगर आणि पुंडलिकनगर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
गजानन महाराज मंदिर ते सेव्हन हिल रस्त्यांवर पत्र्याच्या शेडमध्ये गणेश मूर्ती विक्रीची ५० दुकाने लागली होती. गणेश मूर्ती विक्रीचे शेड उभारण्यासाठी जागा न मिळालेल्यामुळे अनेकांनी चारचाकी मालवाहू वाहनातच गणेशमूर्तींची विक्रीची केली. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीच हजारो भाविक गणेश मूर्तींच्या खरेदीसाठी गर्दी करतात. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन भाविकांनी एक दिवस आधीच मनपसंत मूर्ती खरेदी करून घरी नेली होती. विविध सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि घरी गणेश मूर्तीची स्थापना करणाऱ्या भाविकांनी शुक्रवारी गणेश मूर्तींच्या खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले.
गणेशमूर्ती हजारो भाविक गर्दी करतात ही बाब लक्षात घेऊन रस्त्यावरील गणेश मूर्ती विक्रेत्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले. गणेश मूर्ती विक्रेत्यांसोबतच सजावटीची साहित्य, मखर, हार, झेंडूची फुले, मोर पीस विक्रेत्यांनी येथे गर्दी केली होती.
------------
बाप्पांचा जयजयकार आणि आणि गुलालाची उधळण
गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा देत भाविकांनी लाडक्या गणरायाला आपल्या घरी नेले. अनेक मंडळांनी ढोल ताशासह गणरायाला नेले. अनेक भाविकांनी मूर्तीची खरेदी केल्यानंतर बाप्पासाेबत सेल्फीही काढली.
----------------------------------