शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

औट्रम घाटातील बोगद्याच्या कामाला 'कात्रज'चा घाट; १० वर्षांत खर्च गेला २ हजारांवरून ५५०० कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2021 2:21 PM

घाट व तेथील वाहतूक रामभरोसेच असून, मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात दरड कोसळून वाहतूक ठप्प होण्याच्या घटना घडत आहेत.

ठळक मुद्देडीपीआरचे काम अजून संपेनाकामाला लागणार सहा वर्षेपाच वर्षांत पाच वेळा दरड कोसळली

- विकास राऊतऔरंगाबाद : नॅशनल हायवे क्रमांक २११ वरील औरंगाबाद ते धुळे मार्गावर कन्नड व चाळीसगावच्या मधील औट्रम घाटातील बोगद्याचे काम १० वर्षांपासून रखडलेले आहे. २ हजार कोटींवरून ५५०० कोटींवर बोगद्याच्या कामाचा खर्च गेला असून आजवर प्रत्येक वेळी खर्चात कपात करण्याचा ‘घाट’ एनएचएआय मुख्यालयाने घातला आहे. बोगद्याचे काम जेव्हा सुरू होईल, तेथून पुढे सहा वर्षे कामाला लागणार आहेत.

२०११ मध्ये एनएच २११ या महामार्गाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धुळे ते औरंगाबाद ते येडशी हा मार्ग एनएचएआयकडे औट्रम घाटासह हस्तांतरित झाला. १० वर्षांत या घाटाचे स्ट्रक्चर ऑडिट किंवा सुरक्षा पाहणी झालेली नाही. त्यामुळे घाट व तेथील वाहतूक रामभरोसेच असून, मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात दरड कोसळून वाहतूक ठप्प होण्याच्या घटना घडत आहेत.सुरुवातीला १५ पैकी ११.५ किमी., नंतर ७ किमी अंतरात बोगद्याचे काम करण्याचे ठरले. सुमारे साडेचार कि.मी. अंतराचे काम मृळ डीपीआरमधून कमी करून ५०० कोटींचा खर्चही कमी केला. आता पुन्हा खर्च कपातीचा घाट घालण्यात आला आहे. कामातील विलंबामुळे सुरुवातीला २ हजार, नंतर ३५०० कोटींवरून सध्या ५५०० कोटींवर बोगद्याच्या कामाचा खर्च गेला आहे.

१४ हजार मीटर डोंगर कधी फोडणारमशीनच्या साहाय्याने १४ हजार मीटर डोंगर फोडावा लागणार आहे, काँक्रिटीकरण करणे, वरील भाग अर्धचंद्राकारात कापणे, बोगद्यातील इलेक्ट्रीसिटीचे काम करणे, व्हेंटिलेशन सुविधेसह हॉस्पिटल बांधण्याच्या कामांचा प्रस्तावात समावेश आहे. पूर्वीच्या डीपीआरमध्ये २३ हजार मीटर डोंगर कापून त्यातील दगड बाहेर काढणे प्रस्तावित होते. नंतर १४ हजार मीटर डोंगर कापावा लागेल, असे ठरले. आता पुन्हा डीपीआरचे काम सुरू केले आहे.

पाच वर्षांत पाच वेळा दरड कोसळलीकन्नडमार्गे चाळीसगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ११ कि.मी.चा औट्रमघाट वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. त्या घाटाला पर्यायी मार्ग नसल्यामुळे मागील काही वर्षांपासून रोज १२ हजारांहून अधिक वाहनांचा राबता तेथून होत आहे. २०१७ च्या पावसाळ्यात झालेल्या ७० मि.मी. पावसाच्या तडाख्याने घाटात साडेतीन मीटरपर्यंतचे भूस्खलन होऊन दरड कोसळली. २०१८, २०१९ आणि २०२० मध्येही कमी-अधिक प्रमाण दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. २०२१ मध्ये तर साडेपाच मीटरहून अधिक भूस्खलन झाले. कन्नड तालुक्यातील सातपैकी तीन मंडळात १०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस ३१ ऑगस्ट रोजी झाल्याने दरडी कोसळून वाहनांवर पडल्या.

प्रकल्प संचालकांची माहिती अशीनॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक अरविंद काळे यांंनी सांगितले, औट्रम डीपीआरचे काम सुरू आहे. ५५०० कोटींचा अंदाजित खर्च आहे. त्यात कपात करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. साधारणत: ३०० कोटी प्रति किमी.चा खर्च बोगद्याला लागणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी : घाट पाच दिवसांसाठी बंदजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी औट्रम घाटात भेट देत घाटातील तपासणी नाका खुला करण्याचे आदेश दिले. घाटातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पर्यायी बोगदा निर्माण करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे देणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, औट्रमघाट सुमारे पाच दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागणार आहे. नांदगावमार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. मलबा मोठ्या प्रमाणात पडलेला आहे, असे प्रकल्प संचालक काळे यांनी सांगितले.

टॅग्स :fundsनिधीAurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग