लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मागेल त्याला शेततळे योजनेंअंतर्गत जिल्ह्यात चार हजार शेततळे खोदण्यात आले आहेत. मात्र, अनेक शेतकºयांना काम पूर्ण करूनही अनुदान मिळालेले नाही. शिवाय शेततळ्यावर आच्छादन टाकण्यासाठी मोठा खर्च करणे शक्य होत नसल्याने शेकडो शेततळी आच्छादनाविनाच आहेत.टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मागेल त्याला शेततळे ही योजना राबविण्यात येत आहे. वर्ष २०१६-१७ व २०१७-१८ साठी मागेल त्याला शेततळ्यासाठी १३ हजार ८८५ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज केले. पैकी अकरा हजार ४८० शेतकºयांचे अर्ज कृषी विभागाकडून मंजूर करण्यात आले. यातील दहा हजार ११६ शेतकºयांना कृषी विभागाने शेततळ्याचे काम सुरू करण्याचे आदेश दिले.मात्र, शासनाकडून मिळणाºया पन्नास हजारांच्या अनुदानात शेततळ्याचे काम पूर्ण होत नसल्याने अनेक शेतकºयांना आर्थिक अडचणींमुळे शेततळ्याचे खोदकाम करता आले नाही. पदरमोड करत चार हजार ३०६ शेतकºयांनी शेततळ्याचे काम पूर्ण केले. कृषी विभागाक डून खोदकाम पूर्ण केलेल्या शेतकºयांना १८ कोटी ६६ लाख ९४ हजारांचे अनुदान वाटप केले.खोदकाम पूर्ण करूनही अनेक शेतकºयांना अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. शेततळ्याचे खोदकाम झाल्यानंतर त्यावर आच्छादन टाकण्यासाठी दोन ते तीन लाखांचा खर्च येतो. मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत यासाठी कुठलीही तरतूद नाही. परिणामी अच्छादनाअभावी बहुतांश शेतळ्यांमध्ये गवत उगले आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी शेततळ्यात साठविणे शक्य होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
शेकडो शेततळे आच्छादनाविनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:31 AM