लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वच्छ जालना, आनंदी जालना शहरासाठी शेकडो जालनेकरांसह लोकप्रतिनिधींनी सोमवारी हातात खराटा घेऊन स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. लोकमत व जालना नगर परिषदेच्या वतीने आणि कालिका स्टील, अरुणिमा फाऊंडेशन व परिवार सुपर मार्केट यांच्या सहकार्याने ही स्वच्छता मोहीम सोमवारी शहरात राबविण्यात आली. तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने मान्यवरांनी मार्गदर्शन केले.शहरातील गांधीचमन चौकातून सकाळी साडेआठ वाजता स्वच्छता अभियानास प्रारंभ झाला. माजी मंत्री आ. राजेश टोपे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, माजी आ. कैलास गोरंट्याल, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, उपजिल्हाप्रमुख पंडितराव भुतेकर, भाजप जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, उपाध्यक्ष भास्कर दानवे, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे, संजय देठे, कालिका स्टीलचे अतुल परमार, स्वप्नील डोंगरदिवे, गजानन मुंडे, अरुणिमा फाऊंडेशनचे नीलेश सारस्वत, परिवार सुपर मार्केटचे आसिफ कच्छी, शाकीर कच्छि, समर्पण ग्रुपचे शांतीलाल राऊत, मयूर देविदान, दीपक टेकाळे, रवींद्र देशपांडे यांनी हातात झाडू घेऊन परिसरात स्वच्छता केली. तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करत नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला.शहरातील फुले मार्केट परिसरात स्थानिक नागरिक, व्यापारी व नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक अशोक लोंढे, व्यापारी मित्रमंडळाचे सदस्य भागवत जावळे, सतीश संचेती, दलपत बिष्णोई, प्रेम विष्णोई, यांच्यासह कर्मचाºयांनी फुले मार्केट, सावरकर चौक, अलंकार चौक, भाजीमार्के ट परिसरात संपूर्ण स्वच्छता केली.परिसरातील संपूर्ण रस्त्यांची स्वच्छता करून कचरा भरून ट्रॅक्टरमध्ये टाकण्यात आला. शिवाजी पुतळा चौकामध्येही नगरसेवक जगदीश भरतिया, स्वच्छता निरीक्षक खर्डेकर नगरपालिकेचे कर्मचाºयांनी यांनी शिवाजी पुतळा परिसर, पोस्ट आॅफिस रोड, बडीसडक, कादराबाद रस्त्यावरील संपूर्ण कचरा उचलून टॅक्ट्ररमध्ये टाकण्यात आला. भोकरदन नाका परिसरातील अग्रसेन चौक, बसस्थानक रस्त्याची स्वच्छता करण्यात आली.
स्वच्छतेसाठी सरसावले शेकडो हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 1:16 AM