शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

विज्ञान जत्रेत शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग

By admin | Published: January 08, 2017 12:05 AM

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे विज्ञान जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे हॅलो मेडिकल फाऊंडेशन, विज्ञान वाहिनी, दुर्गादेवी ट्रस्ट, पुणे संचलित ग्रामीण विज्ञान केंद्र, अणदूरच्या वतीने ६ व ७ जानेवारीला दोन दिवसीय विज्ञान जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या जत्रेत शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी धिकारी आनंद रायते यांच्या हस्ते जत्रेचे शुक्रवारी उद्घाटन झाले असता, शनिवारी बक्षीस वितरणाने समारोप करण्यात आला. दरम्यान, शनिवारी सकाळी शिवारफेरीच्या माध्यमातून पक्षी व निसर्ग निरीक्षणासाठी पळस निलेगाव प्रकल्प बाभळगाव येथे विद्यार्थ्यांनी पक्षी व निसर्ग पाहण्याचा आनंद लुटला. प्रश्नमंजुषेमध्ये ५वी ते ७वी प्राथमिक गटामध्ये प्रथम- स्नेहा चंद्रवर्धन खंदाडे (लातूर), मोहिनी बळीराम कसबे (बाभळगाव), तर द्वितीय पार्थ व्यंकट कदम (अणदूर), श्रीराम विठ्ठल जाधव (शिरगापूर) यांनी मिळविला. माध्यमिक गटामध्ये समृद्धी भारतराव जगताप (नांदुरी), विवेक नागेश बऱ्हाणपूरकर (चपळगाव), आकाश दत्तात्रय गायकवाड (किलज), कार्तिक दरबाजी सरडे (नळदुर्ग), अजिंक्य दीपक चव्हाण (सलगरा मड्डी), प्रणिता प्रकाश सुरवसे यांना वरील दोन गटात प्रथम तर श्रावण उटगे (लातूर), अभिषेक भस्मे (अणदूर), ऐश्वर्या चाबुकस्वार (चिवरी) यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. यानंतर माजी पोलीस आयुक्त सुरेश कंदले, महादेव नरे, डॉ. अशोक कदम, मनोहर घोडके यांच्या हस्ते विज्ञान साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी विविध प्रकारच्या ५० प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. यात प्राथमिक गटामध्ये प्रथम- मॅजिकबोट- फिनिक्स इंग्लिश स्कूल, अणदूर, द्वितीय- जि.प.प्रा. शाळा आरळी (बु), तर तृतीय जि.प. प्रा. शाळा नळदुर्ग यांनी पटकावले आहेत. माध्यमिक गटामध्ये प्रथम- जवाहर विद्यालय अणदूर, द्वितीय- राजीव गांधी विद्यालय हंगरगा (नळ), तर तृतीय- भैरवनाथ विद्यालय चिकुंद्रा यांनी पटकावला आहे. दरम्यान, विज्ञान जत्रेतील यशस्वी स्पर्धकांना जि.प.चे उपाध्यक्ष सुधाकर गुंड यांच्या हस्ते बक्षीस वाटप केले. यावेळी सुरेश कंदले, डॉ. शुभांगी अहंकारी, डॉ. अशोक कदम, महादेव नरे, सोमानी क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. विज्ञान जत्रेचे आयोजन डॉ. शशिकांत अहंकारी यांनी केले होते. यशस्वीतेसाठी दुर्गादेवी ट्रस्ट, पुणे येथील विश्वस्त कुलदीप जोशी, प्रा. दीपक बोरनाळे, भगीरथ कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन बसवराज नरे यांनी केले. आभार डॉ. शुभांगी अहंकारी यांनी मानले. विज्ञान जत्रेसाठी प्रसन्न कंदले, बालाजी जाधव, प्रबोध कांबळे, जावेद शेख, गुलाब जाधव, संध्या रणखांब, भारती मिसाळ, नागिनी सुरवसे, इम्तियाज खान, अ‍ॅनिमेटर, भारत वैद्य आदींनी परिश्रम घेतले. विज्ञान जत्रेमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविल्याचे आयोजकांनी सांगितले.(वार्ताहर)