शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

गोडाऊन फोडून लाखोचा माल पळविणारी टोळी अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 7:16 PM

आठ दिवसांपूर्वी शेकटा येथील एका व्यापाऱ्याचे गोडाऊन फोडून सुमारे २७ लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या.

औरंगाबाद : आठ दिवसांपूर्वी शेकटा येथील एका व्यापाऱ्याचे गोडाऊन फोडून सुमारे २७ लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. गोडाऊनमधील चोरलेल्या मालापैकी सुमारे ४ लाखांचा माल आणि टेम्पो पोलिसांनी जप्त केला. शेख नासेर शेख अब्दुल (३२, रा.कागजीपुरा), अमरसिंग मठल्लूसिंग मौर्य (२८, मूळ रा. शकरदहा, ता.कुडा, जि.प्रातपगड, उत्तर प्रदेश, ह.मु. वडगाव कोल्हाटी) आणि मोहंमद आमेर गुलाम साबेर (३२, रा.दुखीनगर कदीम जालना), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या टोळीचा मुख्य सूत्रधार मंजूर पिंजारी (रा. नाचनवेल, ता.कन्नड), चंद्रकांत रामचंद्र शनोरे (४३, रा.गाडेमळा, सिन्नर, जि.नाशिक) अन्य दोन जण फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग म्हणाले की, १७ एप्रिलला रात्री चोरट्यांनी शेकटा येथील किराणा दुकानदार प्रवीण संजय झवर यांचे गोडावून फोडून सुमारे २७ लाखांचा माल चोरून नेला होता. पोलीस चोरट्यांचा शोध घेत असताना उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत यांना खबऱ्याने कळविले की, ही चोरी नाचनवेल येथील मंजूर पिंजारी टोळीने केली. तो फरार असल्याचे पोलिसांना समजले. तपासाअंती पोलिसांनी शेख नासेर याला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली असता त्याने    ही चोरी मंजूर पिंजारी, चंद्रकांत शनोरे, अमरसिंग मौर्य आणि अन्य दोन जणांनी केल्याचे सांगितले. शेकटा येथील गोडावूनमधून लुटलेला माल नाशिक, जालना आणि वडगाव कोल्हाटी येथे विक्री केल्याची कबुली दिली. 

त्यावरून पोलिसांनी चोरीचा माल विकत घेणारा जालना येथील मोहंमद आमेर यास ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून तंबाखूची २५ पोती, तर आरोपी अमरसिंग याच्या वडगाव कोल्हाटी येथील घरातून बिस्किट पुडे, शाम्पू डबे आणि अन्य सामान, असा सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज जप्त केला. शिवाय चोरीचा माल वाहतूक करण्यासाठी आरोपींनी वापरलेला टेम्पो हस्तगत केला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. आरतीसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भुजंग, उपनिरीक्षक दुलत, गणेश जाधव, नवनाथ कोल्हे, विक्रम देशमुख, संजय काळे, बाळू पाथ्रीकर, विठ्ठल राख, सुनील शिराळे, राहुल पगारे, सागर पाटील यांनी केली.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसArrestअटकRobberyचोरी