औरंगाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी उद्योग संघटना सरसावल्या असून शनिवारी अँटिजन टेस्टसाठी तीन ठिकाणी कॅम्प आयोजित करण्यात आले होते. ‘मासिआ’च्या चिकलठाणा, वाळूज येथील कार्यालयात आणि मराठवाडा ऑटो क्लस्टरमध्ये संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह कामगार- कर्मचाऱ्यांनी तपासणी करुन घेतली. याशिवाय अन्य मोठ्या उद्योगांतही अशा प्रकारची तपासणी करण्यात आली.
शनिवारी संपूर्ण दिवस लॉकडाऊन असताना देखील तीनही ठिकाणच्या कॅम्पमध्ये सकाळपासून सुरळीतपणे कोरोनाबाबतची तपासणी सुरु होती. दुसरीकडे, औरंगाबादेतील चारही औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांवर लॉकडाऊनचा परिणाम जाणवला नाही.
जिल्हा प्रशासनाने उद्योगांतील सर्व घटकांना दर पंधरा दिवसांनी कोरोनाबाबतची तपासणी अर्थात ‘आरटीपीसीआर’ करण्याचे आदेश दिले आहेत; परंतु उद्योगांतील दोन- अडीच लाख कामगार- कर्मचाऱ्यांच्या ‘आरटीपीसीआर’साठी तेवढी मोठी आरोग्य यंत्रणा नाही. त्यामुळे सध्या तरी अँटिजन टेस्ट करण्याचा निर्णय उद्योग संघटनांनी घेतला आहे. त्याकरिता मुंबईच्या एका खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळेला कंत्राट दिले आहे. या प्रयोगशाळेच्या पथकांनी तीनही ठिकाणी कामगारांच्या अँटिजन टेस्ट घेतल्या. दिवसभरात कामगार, कर्मचारी व पदाधिकारी मिळून .................. एवढ्या अँटिजन टेस्ट करण्यात आल्या असून त्यात ........... एवढे कोरोनाबाधित आढळून आले.
चौकट........
उद्योग सुरळीत चालले पाहिजेत
‘मासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ म्हणाले की, चिकलठाणा येथील ‘मासिआ’च्या कार्यालयात आपण स्वत: शनिवारी सकाळच्या सत्रात अँटिजन टेस्ट करुन घेतली. यापुढे वारंवार लॉकडाऊनसारखी परिस्थिती कोणालाही परवडणारी नाही. उद्योगांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी आम्ही स्वत:च्या खर्चाने कामगार- कर्मचाऱ्यांच्या कोरोनाबाबतच्या तपासण्या करुन घेत आहोत. स्थानिक प्रशासनाचे चांगले सहकार्य मिळत आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये शनिवारी कोणतीही अडचण आली नाही. औरंगाबादेतील सर्व उद्योग व्यवस्थित सुरू आहेत.
चौकट.......
‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत यांनी सांगितले की, मागच्या लॉकडाऊनसारख्या अडचणी यावेळी आल्या नाहीत. यावेळी प्रशासनाकडून पास घेण्याची गरज नाही. कंपनीचे ओळखपत्र पाहून पोलीस यंत्रणा कामगारांना अडवत नव्हती. कामगारांना कंपनीत ने-आण करणाऱ्या बसेसनाही काही अडचण आली नाही. कामगारांच्या दर पंधरा दिवसांनी नियमित तपासण्या करण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. त्यानुसार सर्व उद्योगांना संघटनांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. उद्योगांमध्येही कोरोनाच्या सर्व नियमांची अंमलबजावणी केली जात आहे.