औरंगाबाद : 'मी संपूर्ण कुटुंबाचे काम करत नाही. पती कुटुंबीयापासून वेगळं राहत नाही म्हणून मी आत्महत्या करीत आहे, पतीचा काहीही संबंध नाही.' अशी सुसाईड नोट लिहून राहत्या घरात बेडरूममध्ये सकाळी आठ वाजेच्या सुमारास विवाहीतीने गळफास लावून आत्महत्या केली. पपिता राहुल वानखेडे ( २४ रा.साई कॉलनी शिवाजी नगर वाळूज ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
पपीताने सोमवारी सकाळी चार वाजता सासरा, दिर, पतीला डब्बा करून दिला. सासू आणि नणंद दहा महिन्यांच्या मुलीला झोपी घालत होत्या. बराच वेळ झाल्याने पपिता यांचं प्रतिसाद न आल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला असता पपीता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. यावेळी त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.याप्रकरणी वाळूज ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोरख चव्हाण,मनीषा केदार पुढील तपास करत आहे.
आमची मुलीने आत्महत्या केली नाही- मुलीचे नातेवाईकलग्न झाल्यापासून आमच्या मुलीला त्रास होता. तसेच तिचा पती तिच्यावर नियमित संशय येत होता. आमची मुलगी आत्महत्या करू शकत नाही. तसे तिच्याजवळ आढळलेल्या चिठ्ठीत लिहिलेला मजकूर आणि तिचा हस्ताक्षर वेगळ असल्याचे मृत महिलेचा भाऊ प्रवीण इंगळे यांनी सांगितले.