शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

रात्री होणाऱ्या चॅटिंगमुळे नवरा- बायकोची उडाली झोप; संशयामुळे वैवाहिक आयुष्य पणाला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2022 1:22 PM

नवीन जोडप्यांमध्ये मोबाईलमुळेच होतोय सर्वाधिक कलह

- राम शिनगारेऔरंगाबाद : व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडियामुळे नवरा- बायकोंमधील संवाद कमी होत आहे. सोशल मीडियावर शालेय जीवनातील मित्र-मैत्रिणींसोबत चॅटिंग केली जाते. त्यामुळे अनेकांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये ताणतणाव निर्माण झाला आहे. याविषयीच्या तक्रारींचा ओघच भरोसा सेलकडे दररोज येत आहे.

पती-पत्नीच्या वादाला मोबाइल हेच कारणपती- पत्नीमधील बहुतांश वादाला मोबाइल हेच कारण बनले आहे. अनेक तक्रारींमध्ये पत्नी-पती सतत फोनवर बोलणे, सोशल मीडियावर चॅटिंग करण्यात वेळ घालवतात. त्यातून वाद होत आहेत.

सहा महिन्यांत शेकडो तक्ररीभराेसा सेलकडे मागील सहा महिन्यांत मोबाइलवरून झालेल्या वादाच्या शेकडो तक्रारी दाखल आहेत. या तक्रारींवर संबंधितांना एकत्रितपणे बोलावून घेत समुपदेशन करीत पुन्हा संसार जुळविण्याचे काम केल्याची माहिती निरीक्षक आम्रपाली तायडे यांनी दिली.

सोशल मीडियामुळे संवाद संपलाघरी येताच मोबाइल चेक : पती एका कंपनीत कामाला आहे. तो घरी येताच पत्नी पतीचा मोबाइल घेऊन चेक करते. दिवसभरात कोणाचे कॉल आले. कोणाशी चॅटिंग केली. याविषयी पाहणी केली जाते. त्यातून सतत खटके उडतात.पती कंपनीत जाताच चॅटिंग : एका घटनेत पती नाईटला कंपनीत जाताच पत्नी झोपताना अंगावर पांघरूण घेऊन आतमध्ये व्हाॅट्सॲपवर मध्यरात्रीपर्यंत चॅटिंग करीत राहते. सासऱ्याने अनेकवेळा बघितल्यानंतर विचारणा झाली. तेव्हा वाद पोलिसांपर्यंत पोहोचला.पतीने काढून घेतला मोबाइल : एका घटनेत पतीने पत्नीचा मोबाइल काढून घेतला. नातेवाइकांसह कोणालाही बोलायचे असेल तर स्वत:च्या मोबाइलवरूनच. त्यामुळे मोबाइल वाद भरोसा सेलपर्यंत पोहोचला.

रात्री मोबाइलपासून दूर राहिलेलेच बरेघरी आल्यानंतर बेडवर झोपल्यावरही दोघे पती-पत्नी मोबाइललाच चिटकून असतात. त्याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर होत आहे. त्यामुळे रात्री मोबाइलपासून दूर राहणेच कौटुंबिक स्वास्थ्यासाठी चांगले आहे.

एकमेकांना वेळ देणे हाच उपायपती-पत्नीने एकमेकांना वेळ देणे हाच वादावरील तोडगा आहे. सोशल मीडिया, फोनवर बोलण्यापासून दूर राहिले पाहिजे. त्याचा अतिवापर झाल्यास त्याचे दुष्परिणाम पती-पत्नीच्या नात्यावर होतात. हे टाळण्यासाठी वेळ दिला पाहिजे. विशेषकरून नवविवाहित दाम्पत्यांनी तर याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.- आम्रपाली तायडे, निरीक्षक, भरोसा सेल

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादcyber crimeसायबर क्राइम