औरंगाबाद: दारूच्या व्यसनाबद्दल दूषणे देणाºया पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास वाळूज येथील सिडको महानगरात उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.प्रवीण प्रभाकर पाटील (३२) आणि आरती प्रवीण पाटील (२६,दोघे रा.गुरूदक्षिणा अपार्टमेंट, सिडको वाळूज)असे मृत दाम्पत्याचे नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, प्रवीण हा एका खाजगी कंपनीत काम करायचा तर आरती ही गृहीणी होती. त्यांना ९वर्ष आणि दिड वर्षाची दोन मुले आहेत. प्रवीण राहत असलेल्या अपार्टमेंटमध्येच त्याची सासू-सासरे, भाऊ हे स्वतंत्र फ्लॅटमध्ये राहात. प्रवीण अधूनमधून मद्य प्राशन करीत होता. त्यामुळे पती-पत्नीत वाद होत. तीन दिवसापूर्वी प्रवीण पुन्हा मद्य प्राशन करून आला होता. त्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि आरती रागाच्या भरात खालच्या मजल्यावर राहणाºया माहेरी दोन मुलांसह राहण्यास गेली. त्याचा राग प्रवीणला राग आला होता. पुन्हा मद्य न पिण्याचे वचन प्रवीणने शुक्रवारी पत्नी आणि सासूसासरे यांना दिले. त्यानंतर रात्री या दाम्पत्याने आरतीच्या माहेरीच जेवण केले आणि मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास आरती दोन मुलांना सोबत घेऊन प्रवीणसोबत वरच्या मजल्यावरील त्यांच्या घरी गेली. समोरच्या हॉलमध्ये प्रवीणचे वडिल तर त्यांच्या बेडरूमध्ये दोन मुले झोपली होती.मध्यरात्रीनंतर प्रवीणने आरतीचा गळा आवळून खून केला,नंतर त्याने स्वयंपाक खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास मोठ्या मुलाच्या शाळेची वेळ झाली तरी कोणीही झोपेतून उठले नाही, म्हणून प्रवीणचे वडिल हॉलमधून आत गेले तेव्हा त्यांना प्रवीणने गळफास घेतल्याचे दिसले यावेळी खालच्या मजल्यावर जाऊन प्रवीणचा भाऊ आणि सासू-सासºयांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी आत जाऊन पाहिले असता आरती हिचा गळा घोटलेला दिसला. या घटनेची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे आणि कर्मचाºयांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.
पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर पतीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 1:50 PM