शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

हुश्श्य...९ महिन्यांनंतर ‘सिव्हिल’ झाले रिकामे; कोरोनाचा एकही रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 2:00 PM

coronavirus कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये जिल्हा रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात झाले.

ठळक मुद्देब्रिटन रिटर्न तरुणाचा दुसरा अहवालही निगेटिव्ह, रुग्णालयातून सुटी

औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल ‘ब्रिटन रिटर्न’ तरुणाचा दुसरा अहवालही बुधवारी निगेटिव्ह आला. दोन अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यास रुग्णालयातून सुटी देण्यात आली. रुग्णालयातच गेल्या ९ महिन्यांत प्रथमच एकही कोरोना रुग्ण दाखल नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये जिल्हा रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात झाले. गेल्या ९ महिन्यांपासून याठिकाणी केवळ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. नव्या स्ट्रेनच्या रुग्णांवरही याठिकाणी उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार इंग्लंडहून आलेला एक २९ वर्षीय तरुणही काेरोनाबाधित असल्याचे निदान झाले होते. या तरुणावर २७ डिसेंबरपासून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. या तरुणाचा सोमवारी तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आला. त्यानंतर बुधवारी दुसऱ्या स्वॅब घेण्यात आला आणि त्याचा अहवालही निगेटिव्ह आल्याने त्यास रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने काहीसा सुटकेचा नि:श्वास घेतला आहे.

ओपीडी सुरू होण्याचा मार्ग मोकळाजिल्हा रुग्णालयात मार्चपासून केवळ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. लसीकरणाची तयारीही अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा रुग्णालयात ओपीडी सुरू होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. २६ जानेवारीपासून सुरु होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद