मंडळाच्या अध्यक्षा कनक मल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या खेळविषयक कार्यक्रमात पूनम सारडा यांनी प्रकल्पप्रमुख म्हणून काम पाहिले. ॲड. रिना डोडया आणि तृप्ती सोनी यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय पारितोषिक पटकाविले. ग्रुप सेल्फी गेम स्पर्धेत मीना सोनी, वैष्णवी दरक यांना प्रथम, द्वितीय बक्षीस मिळाले. तर श्रुतिका बाहेती, शामल झंवर यांनी ग्रुप कॉमेडी व्हिडिओ स्पर्धेत बक्षीस मिळविले. ‘सुहाने सफर के अनोखे पल’ या स्पर्धेत मेघा लड्डा, पल्लवी लड्डा, अक्षदा सारडा, शामल झंवर, मंगल सारडा, ज्योती सारडा विजयी ठरल्या. प्रेम बाहेती यांनी परीक्षण केले. शिवचित्र मंडला आर्ट स्पर्धेत मनस्वी बजाज, श्रुती काकाणी, उन्नती दहाड, सेजल मंत्री, सृष्टी मंत्री यांच्यासह मोठ्या गटातून प्रतिमा साबू, मेघा लड्डा, वैष्णवी मंत्री, अनुजा साबू, श्रुतिका बाहेती, नकुल मंत्री आणि स्वाती सोनी यांनी बक्षीस मिळविले. अनुराधा धूत, अनुपमा लड्डा यांनी परीक्षण केले. मीना सोनी, भारती मंत्री, रेणुका मंत्री यांनी प्रकल्प प्रमुख म्हणून काम पाहिले. रीना डोडया यांनी विविध सरबते बनविण्याचे तर सूचिता लोया यांनी नैसर्गिक रंग बनविण्याचे प्रशिक्षण दिले. शीतल दहाड, सीमा दरक, अर्चना तोषणीवाल, प्रेरणा मंत्री, नंदा नावंदर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. सोनाली सारडा यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहल सोमाणी यांनी आभार मानले.
ऑनलाइन कार्यक्रमात महिलांची धमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:04 AM