शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

मी खेड्यातील लोकांचा संवेदनशील प्रतिनिधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:16 AM

साहित्य हे समाजाच्या परिवर्तनाला पूरक गोष्ट आहे. ज्या मातीत जगलो, त्या मातीविषयीच्या भावना संवेदनशीलपणे टिपत आजपर्यंतचा प्रवास झाला. यातून चिंतनशील गोष्टी मांडण्याचा, जगण्याचा प्रयत्न केला.

राम शिनगारे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या परिवर्तनाला पूरक गोष्ट आहे. ज्या मातीत जगलो, त्या मातीविषयीच्या भावना संवेदनशीलपणे टिपत आजपर्यंतचा प्रवास झाला. यातून चिंतनशील गोष्टी मांडण्याचा, जगण्याचा प्रयत्न केला. याची आता साहित्य अकादमीने दखल घेतली. तरीही लेखकाने आपले काम करीत राहावे, इतर संस्था आपले काम करीत असतात. यात साहित्य अकादमीसारखे पुरस्कार मिळाल्यावर त्यातील सन्मानापेक्षा जोखीमच अधिक असते. यामुळे आणखी जबाबदारीने वागावे, बोलावे, लिहावे लागते, अशी संवेदनशील भावना साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी श्रीकांत देशमुख यांनी व्यक्त केली. ‘लोकमत’ कॉफी टेबल उपक्रमात गुरुवारी त्यांनी लोकमतच्या संपादकीय सहकाºयांशी संवाद साधला. या चर्चेत त्यांनी बालपणापासून ते आजपर्यंतच्या सर्व वाटचालीचा अनुभव व्यक्त केला. नुकताच त्यांच्या ‘बोलावे ते आम्ही’ या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.प्राध्यापक म्हणून नोकरीकरण्याचे स्वप्नऔरंगाबाद येथील विद्यापीठात शिकल्यानंतर नांदेडला प्राध्यापक म्हणून रुजू झालो. तेथे तीन वर्षे नोकरी केली. मात्र संबंधित संस्थेत झालेल्या त्रासामुळे प्राध्यापकी सोडण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी सुरू केली. यातूनच १९९३ साली क्लास-१ अधिकारी बनलो. मात्र माझा प्राध्यापकाची नोकरी करणे हाच पिंड होता. तेच स्वप्न होते. मात्र वाळवंटातही बाग फुलवता येते. त्याप्रमाणे प्रशासनात असतानाही साहित्याचा मळा फुलवता येतो. हेच आयुष्यात जगलो. प्रत्यक्ष कृतीतही उतरवले.कविता ही जगण्याशी निगडित असतेमराठीत असंख्य कवी आहेत. तुकोबा, ज्ञानेश्वर यांच्यासह जी काही नावे समोर येतात. त्यांचे आयुष्य खडतर असल्याचे दिसून येते. कवितेच्या प्रांतात अस्सल आणि स्वत:ची भाषा असणारेच टिकतात. वेगळेपण जपतात. सहजपणे वावरतात. कला ही समाजाशी निगडित असते. कलावंतांचा संघर्ष हा स्वत:शीच असतो. त्यात सुसंवाद, संघर्ष असतो. यातून जे काही निघते, ते अप्रतिम असते. जगण्याशी निगडित असते. कविताही अशीच असते. कवीने समाजशील (समाजवादी नव्हे) परंपरा स्वीकारली पाहिजे. त्यात विद्रोह आहे; परंतु तो स्वीकारला पाहिजे.प्रशासनात संवेदनशीलराहिले पाहिजेप्रशासनात असताना साहित्याची निर्मिती होऊ शकते. प्रशासनाकडे येणारी माणसे, ही आपल्या बापाप्रमाणेच असतात. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपला बाप आठवतो. तेव्हा आपुलकीची भावना निर्माण होते. तेव्हा प्रशासनात अधिकाºयांनी संवेदनशील राहिले पाहिजे. याचाच परिणाम मी पूर्णवेळ नोकरी करताना संवेदनशील असतो. मी ज्या वर्गातून येतो. त्या वर्गाचा केवळ संवेदनशील प्रतिनिधी आहे. पूर्वी ग्रामीण साहित्य असा शब्दप्रयोग केला जात होता. मात्र आता बदलले पाहिजे. ग्रामीण साहित्याऐवजी कृषी साहित्य असे म्हटले जावे. कारण कृषी संस्कृती हीच मध्यवर्ती आहे. आता जागतिकीकरणाच्या काळात बळीराजा, काळीआई अशा भावनिक मुद्यांपासूनही दूर जाण्याचा सल्लाही देशमुख देतात.कलावंतांमध्ये जातीयतावाढते आहे...लेखकाला जात, धर्म, पंथ काहीही नसतो. मात्र काही काळापासून कलावंतांमध्ये जातीनिष्ठता, धर्मनिष्ठता वाढत चालली आहे. हे धोकादायक आहे. मुळात कलावंताचा अविचार धोकादायक ठरू शकतो. कलावंतांनी सगळ्याच घटकांकडे अंतर्भेद सोडून पाहिले पाहिजे. याशिवाय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा नेहमीच चर्चेला येतो. तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्या आधीच्या काळापासून सुरू आहे. तेव्हा ती आता नवीन आहे, असे काही नाही. पूर्वीही होती, आताही आहे अन् भविष्यातही राहील. मात्र याविरोधात सर्व घटकांतील कलावंतांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे हे महत्त्वाचे आहे.मंचीय कवितेसाठीतडजोडी कराव्या लागतातसाहित्य संमेलने, इतर मंचीय ठिकाणावरून कविता सादर करण्यासाठी तडजोडी स्वीकाराव्या लागतात. मंचावरचा थिल्लरपणाही पराकोटीचा असतो. त्यात गंभीरता नसते. आपली कविता गंभीर, जगण्याशी निगडित आहे. कविता किंवा सूत्रसंचालनातून कमरेखालच्या गोष्टी व्यक्त होऊ नयेत. मात्र, त्याचा आता अधिक बोलबाला असतो. यामुळे मंचीय कवितांमध्ये सहभागी होत नाही. याशिवाय बोलावले तरी जात नसल्यामुळे आता लोकही बोलवत नाहीत....तर राष्ट्रीयतेला धोका निर्माण होईलदलित अत्याचार, शेतकरी आत्महत्या, सैनिक शहीद झाल्यानंतर पूर्वी असणारी संवेदनशीलता आता कुठे हळूहळू कमी होताना दिसत आहे. ही संवेदनशीलता कायम राहणे हे अतिशय गरजेचे आहे. जर याचे पर्यवसान असंवेदनशीलतेत होऊन तो समाजधर्म बनला तर हा राष्ट्रीयतेला धोका आहे. यावेळी कलावंत महत्त्वाचे असतात.सोशल मीडियात उथळपणा अधिकमातीशी निगडित असलेला प्रत्येक घटक संस्कृती निर्माण करत असतो. मात्र आता सोशल मीडियामुळे सर्वच बाबतीत उथळपणा येत आहे. घरामध्ये असणारे आर्टिफिशियल झाड आणि वाळवंटातही तग धरून वाढणारे निवडुंग असा हा फरक आहे. तंत्रज्ञानामुळे आपण जवळ आलो. पण समजून घेण्याचे प्रमाण घटत आहे. १९९० नंतर झालेले वेगवान बदल हे मागील दोन हजार वर्षांत जेवढे बदल झाले, त्यापेक्षा अधिक वेगवान बदल होत असतील, हे निश्चित.