शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

‘मला गरज आहे, १५ हजार पाठवा...’ माजी विभागीय आयुक्त भापकर यांचे फेसबुक अकाउंट हॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 12:53 PM

अनेक व्यक्तींचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून काही फसवेवीर सायबर भामटे सहज कुणालाही गंडा घालत आहेत.

ठळक मुद्देमाजी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, निवृत्त प्रा. गणी पटेल, नेत्र चिकित्सा अधिकारी संघटनेचे अध्यक्ष महेश वैष्णव यांच्यासह अनेकांचे फेसबुकवर बनावट अकाउंट उघडून सायबर भामट्यांनी त्यांच्या मित्रांना पैशाची मागणी केल्याचे समोर आले. तोतयाने बनावट अकाउंट उघडले असून, तो मेसेंजरच्या माध्यमातून पैशाची मागणी करीत आहे. कृपया कुणीही त्याच्याशी व्यवहार करू नका, अशी विनंती त्यांनी केली.

औरंगाबाद: ‘मला गरज आहे. १५ हजार रुपये पाठवा’ असा मेसेज औरंगाबादचे माजी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या फेसबुक अकाउंटच्या मेसेंजरवरून तुम्हाला आला तर आश्चर्य वाटू देऊ नका. त्यांच्या डॉ. भापकरांच्या मेसेंजरवरून या मागणीचे मेसेज अनेकांना गेले आहेत.

मोठ्या माणसांनाही पैशांची गरज असतेच की हो. जास्त द्वंद्वात न अडकता, चला देऊ या पाठवून पैसे, म्हणून तुम्ही द्याल पैसे पाठवून. पण सावधान बरं. अशा अनेक व्यक्तींचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून काही फसवेवीर सायबर भामटे सहज कुणालाही गंडा घालत आहेत.माजी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, निवृत्त प्रा. गणी पटेल, नेत्र चिकित्सा अधिकारी संघटनेचे अध्यक्ष महेश वैष्णव यांच्यासह अनेकांचे फेसबुकवर बनावट अकाउंट उघडून सायबर भामट्यांनी त्यांच्या मित्रांना पैशाची मागणी केल्याचे समोर आले. हा प्रकार बुधवारी दुपारीसमोर आला.सायबर गुन्हेगारांनी माजी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट उघडले. त्या अकाउंटवरून त्यांच्या फ्रेंड लिस्टमधील मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. ही फ्रेंड रिक्वेस्ट ज्यांनी स्वीकारली त्या सर्वांशी सायबर गुन्हेगाराने मेसेंजरद्वारे चॅटिंग केली आणि पैशाची मागणी केली. भापकर यांच्या एका मित्राला या भामट्याने १५ हजार रुपये मागितले. ही बाब समजताच डॉ. भापकर यांनी त्या तोतयाने मेसेंजरद्वारे त्यांच्या मित्राला १५ हजार रुपये मागितलेल्या संदेशाचा स्क्रीन शॉट फेसबुकवर अपलोड करून सर्वांना ही बाब सांगितली. तोतयाने बनावट अकाउंट उघडले असून, तो मेसेंजरच्या माध्यमातून पैशाची मागणी करीत आहे. कृपया कुणीही त्याच्याशी व्यवहार करू नका, अशी विनंती त्यांनी केली.

डॉ. गणी पटेल यांचेही फेसबुकवर बनावट अकाउंट उघडून त्यांच्या फ्रेंड लिस्टमधील मित्रांना मेसेंजरच्या माध्यमातून पैशाची मागणी केल्याचे त्यांना समजले. त्यांच्या मित्रांनी त्यांना कॉल करून पैसे पाठवू का, असे विचारले तेव्हा हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. याविषयी ते पोलिसांत तक्रार करणार आहेत. नेत्र चिकित्सा अधिकारी संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश वैष्णव यांचेही बनावट अकाउंट उघडून तोतयाने त्यांच्या अनेक मित्रांकडे पैशाची मागणी केली. हा प्रकार बुधवारी दुपारी समोर आल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

फेसबुकवर वापरकर्त्याने प्रोफाइल सुरक्षित करावेफेसबुक वापरकर्त्याने सर्वप्रथम त्यांचे अकाउंट सुरक्षित कसे राहील याची काळजी घ्यावी. फेसबुकने दिलेल्या सुरक्षा मानकानुसार तुम्ही तुमचे प्रोफाइल गार्ड वापरून सुरक्षित करू शकता. असे केल्यास कोणत्याही वापरकर्त्याची माहिती आणि छायाचित्र अनोळखी व्यक्ती वापरून तुमचे बनावट अकाउंट तयार करणार नाही. शिवाय अनोळखी व्यक्तीच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.- गीता बागवडे, पोलीस निरीक्षक. सायबर पोलीस, ठाणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादcyber crimeसायबर क्राइम