छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने केलेल्या नामांतरणानंतर औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराविरोधात एमआयएम खा. जलील यांनी विविध पक्ष, संघटनांच्या सहकाऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात केली. यावेळी, त्यांनी हे नामांतरण आपणास मान्य नाही, एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या भावनांना किंमत आहे की नाही, असा सवालही यावेळी जलील यांनी उपस्थित केला. जलील यांच्या या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून एका मुस्लीम युवकाने लग्नानंतर थेट आंदोलनस्थळ गाठत आंदोलनात सहभाग घेतला.
औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केले म्हणून खासदार जलील गेल्या तीन दिवसांपासून धरणे आंदोलनाला बसले आहेत. यावेळी मुस्लिम समाजातील एका तरुणाने आपले लग्न होताच औरंगाबाद नामांतराविरोधात धरणे आंदोलन सहभाग घेतला. माझी गरज तिथे नाही, तर या ठिकाणी आहे. त्याकरता मी आज धरणे आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित आहे, असेही या युवकाने म्हटले. विशेष म्हणजे हा नवरदेव लग्नाच्या पोशाखातच इथे पोहोचला होता. लग्नाचे कपडे घालून आलेल्या या नवरदेवाला उपोषणस्थळी पाहून चर्चेचा विषय बनला होता.
रात्रंदिवस बेमुदत उपोषण
केंद्र आणि राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततेच्या मार्गाने बेमुदत साखळी उपोषण करणार असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी आंदोलनादिवशी दिली. उपोषण कोणत्याही राजकीय पक्षांतर्गत नसून तर औरंगाबाद नावाला पसंत करणाऱ्या नागरिकांच्या सहकार्याने हे उपोषण सुरु आहे. नागरिकांना आपली नाराजी व्यक्त करावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावेच लागणार आहे. उपोषण हे फक्त आगामी आंदोलनाची सुरवात आहे. रात्रंदिवस बेमुदत असे हे उपोषण असणार असेही ते म्हणाले.
दरम्यान, खासदार जलील यांनी पुकारलेल्या या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकले होते. त्यामुळे, हे आंदोलन वादाचा मुद्दा ठरले, तसेच राज्यभरातून या आंदोलनासाठी