शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
3
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
4
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
5
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
6
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
8
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
9
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
10
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
11
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
12
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
13
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
14
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
15
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
16
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
17
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
18
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
19
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
20
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार

झुुलेगा पालना...महावीर आयेंगे अंगना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:50 AM

‘झुलेगा सोने-चांदी का पालना... वीर महावीर अब आयेंगे अंगना,’ म्हारो आंगन आये आज देखो मंगल घड़ी’, अशा गीत व नृत्यात सारे हरखून गेले होते. भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवात गायकांनी उपस्थितांवर भक्तिसुरांचा वर्षाव करीत मंगळवारची सायंकाळ अविस्मणीय केली.

ठळक मुद्देऔरंगाबाद : महावीर जन्मकल्याणक महोत्सवात भक्तिसुरांचा वर्षाव

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘झुलेगा सोने-चांदी का पालना... वीर महावीर अब आयेंगे अंगना,’ म्हारो आंगन आये आज देखो मंगल घड़ी’, अशा गीत व नृत्यात सारे हरखून गेले होते. भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवात गायकांनी उपस्थितांवर भक्तिसुरांचा वर्षाव करीत मंगळवारची सायंकाळ अविस्मणीय केली.भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त राजाबाजार येथील हिराचंद कासलीवाल प्रांगण भाविकांनी भरून गेले होते. महिलांची संख्या वाखाणण्याजोगी होती. भव्य रंगमंचावर एलईडी स्क्रीन बसविण्यात आलेहोते. या स्क्रीनवर सकल जैन समाजाद्वारे एकत्रितपणे काढण्यात येणाऱ्या महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या शोभायात्रेचे छायाचित्र दाखविण्यात येत होते. ते पाहून सर्वजण जुन्या आठवणींत रमले होते. स्वाती साहुजी यांनी ‘महामंत्र नवकार’ म्हणत सुरेल भक्तिसंध्येला सुरुवात केली. ‘स्वर्ग से सुंदर स्वप्नों से प्यारा है तेरा दरबार, जहाँ तेरा प्यार मिला है मुझे’ हे गीत सुरेख आवाजात गाऊन आशिष बोथरा यांनी सर्वांच्या हृदयात स्थान मिळविले. यानंतर ‘हम करते है सब को नमन’ या गीतावर तरुणींनी उत्तम नृत्य करीत सर्वांची दाद मिळविली. यानंतर जैन संगीतकार संजय संचेती व समूहाने ‘जहाँ डाल-डाल पर सोने की... ये भारत देश हमारा’ हे देशभक्तीपर गीत सादर करून सर्वांचे मन प्रफुल्लित केले. यानंतर शैलेश पहाडे यांनी ‘हर जनम मे प्रभू तेरा साथ चाहीयें’ हे गीत, तर वैशाली पहाडे यांनी ‘ओ महावीरा, ओ महावीरा’ गीत सादर केले. ‘भक्ती की है रात प्रभूवर आज थाने आनो है’ यासह अन्य पाळणा गीतांनी सर्वांना आत्मानंद मिळवून दिला. याशिवाय सोनल संचेती, कल्पना मेहता यांनीही भक्तिगीत सादर करीत सर्वांना मंत्रमुग्ध केले. प्रारंभी, सकल जैन समाजांतर्गत महोत्सव समितीच्या सर्व पदाधिका-यांनी दीप प्रज्वलन करून भक्तिसंध्येला सुरुवात केली.महिला मंडळांनी आणली रंगतभक्तिसंध्या कार्यक्रमात गीत व नृत्य सादर करून महिला मंडळांनी रंगत आणली. यात चंद्रप्रभू बहु मंडळ, संस्कार महिला मंडळ, पार्श्वनाथ महिला मंडळ, त्रिशला महिला मंडळ, हडको कन्या मंडळ, अरिहंत महिला मंडळ यांचा समावेश होता.

टॅग्स :Bhagavan Mahavir Janmotasavभगवान महावीर जन्मोत्सवAurangabadऔरंगाबाद