आयकॉन स्टीलचा वापर आम्ही आमच्या बांधकाम प्रकल्पात करत आहे. स्टील बारचा उत्तम दर्जा आहे. तसेच गंज विरोधी आहे. यामुळे बार्सचे आयुर्मान वाढते. भूकंपविरोधी क्षमता असल्याने आम्ही आयकॉन स्टीलच वापरतो. तसेच ऑर्डरनुसार वेळेवर स्टील उपलब्ध होते व कंपनीचे पदाधिकारी संपर्कात राहतात, ही जमेची बाजू होय.
नरेंद्रसिंग जबिंदा
अध्यक्ष, औरंगाबाद क्रेडाई
-----
गुणवत्तेसोबत वाजवी किंमत
आयकॉन स्टीलच्या गुणवत्तेची चाचणी आम्ही केली होती. तसेच कंपनीकडून चाचणीचे अहवाल प्राप्त होत असतात. स्टीलची गुणवत्ता चांगली आहेच. आम्ही अधूनमधून स्टील बारचे वजनही तपासत असतो. जेव्हा जेव्हा वजन केले तेव्हा तेव्हा स्टील बारचे वजन अचूक मिळाले. एवढेच नव्हे तर किमतीही किफायतशीर आहे. यामुळे आम्ही आमच्या एक कमर्शियल कॉम्प्लेक्स, एक रो-हाउस व एका अपार्टमेंटच्या बांधकामात आयकॉन स्टीलचा वापर केला आहे.
राजेश काला
सिव्हिल इंजिनिअर