शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

शहरांची नावे बदलून प्रश्न सुटत असतील तर आमचा पाठिंबा : नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2021 6:37 PM

Nana Patole प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांना टोला लगावला.

ठळक मुद्देनाना पटोले यांचा सुभाष देसाई यांना टोला

औरंगाबाद: आमच्या दृष्टीने बेरोजगारी, महागाई, विषमता यासारखे महत्वाचे प्रश्न आहेत. हे प्रश्न सुटले पाहिजेत. नावे बदलून असे प्रश्न सुटत असतील तर नामांतराला आमचा पाठिंबा आहे. असा टोला आज येथे प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)  यांनी औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai ) यांना लगावला. देसाई यांच्या हीच वेळ आहे संभाजीनगर नाव देण्याची या भूमिकेला पटोले यांनी छेद दिला. पत्रकारांशी वार्तालाप करीत असताना ते म्हणाले की, नामांतराचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आल्यावर कोण काय मांडतो ते बघू. ( If changing the names of cities solves the problem, then our support! : Nana Patole) 

स्वातंत्र्याची लढाई लढून कॉंग्रेसने या देशाला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त केले. आता मोदी विरुध्दची लढाई लढण्यास कॉंग्रेस सज्ज असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले. त्यांनी आरोप केला की, केंद्र सरकारचा संविधान व्यवस्थेवर विश्वास नाही. फाळणीदिन साजरा करण्याचे आवाहन करण्याची मनोवृत्ती कशाचे द्योतक आहे. पंतप्रधानच या देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजपची भूमिका आरक्षण विरोधी आहे. रा.स्व. संघाची भूमिका हीच भाजपची भूमिका हे आता लपून राहिलेले नाही, असे ते म्हणाले.

प्रथम संविधान मग धर्म असे सांगत पटोले यांनी, कॉंग्रेसने जाती धर्माच्या पलिकडे जाऊन स्वातंत्र्याची लढाई लढवली. आताही सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन राजकारण करण्याची कॉंग्रेसची भूमिका आहे.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेSubhash Desaiसुभाष देसाईAurangabadऔरंगाबाद