- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) :प्रकाश आंबेडकर साहेबांनी सगळीकडून आरक्षण संदर्भात सारखी मांडणी करावी एवढीच आमची अपेक्षा आहे. त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, काय बोलायचं हा त्यांचा प्रश्न आहे त्यांना काही मी उत्तर देणार नाही, कधी दिलं पण नाही. ते स्पष्ट बोलतात, खर आहे ते बोलतात त्यामूळे सगळ्या जाती धर्मातले लोक त्यांना मानतात. यामुळे सगळ्यांची सारखी बाजू त्यांच्याकडून मांडण्यात आली पाहिजे ही जनतेची अपेक्षा आहे. माझीही जास्त अपेक्षा आहे. त्यांनी जनतेची बाजू मांडणे गरजेच आहे. ते म्हणतात सगेसोयरे भेसळ आहे तर मग ५० टक्क्यांवर गेलेले २ टक्के आरक्षणही भेसळ असेल, असे म्हणायला पाहिजे म्हणजे. त्यानंतर ते सर्व जनतेची समान बाजू घेऊन बोलतात हे सिद्ध होईल, असे भूमिका मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी मांडली. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे मंगळवारी सायंकाळी माध्यमांसोबत संवाद साधला.
मनोज जरांगे पुढे म्हणाले, प्रकाश आंबेडकर साहेबांनी वापरलेला भेसळ ऐवजी बोगस शब्द वापरू. मंत्र्यांनी न्यायाधीशांनी आणि कायद्याच्या अभ्यासकांनी मिळून ठरवलेली आहे आणि ती पक्की आहे आणि टिकणार सुद्धा त्याच्यात सगळ्या जाती-धर्मांना न्याय मिळणार आहे ते जर भेसळ असेल ,तर 50% च्या वर दोन टक्के दिलेल आहे हेही भेसळच असणार. लोकांच्या मनात बसले होते की ते खरं आणि स्पष्ट बोलतात. गोरगरिबांच्या बाजूने बोलतात. माझी वैयक्तिक इच्छा आहे, आम्ही सगळे त्यांना मानतोय, त्यांनी चौफेर सत्य बोलावं. त्यांच्या इतका अभ्यास मला वाटतं कोणाचाही नसणार आहे. मला तरी वाटतं ते अभ्यासपूर्ण असल्याशिवाय बोलत नाही. मला आलेले चार-पाच अनुभव आहे. त्यांच्याबद्दल असलेला सन्मान कायम राहणार आहे, फक्त त्यांनी इथून. मागे जसे कायम समान शब्दावर बोलत होते तेच बोलव. सगेसोयऱ्याबद्दलचं जे त्यांचं बोलणं आहे तेच बोलणं ५० टक्क्यांच्यावर गेलेल्या दोन टक्के आरक्षणाच्या बद्दलही असलं पाहिजे, असेही जरांगे म्हणाले.
जास्तीच्या जागा कोठून आल्या जे १६ टक्के आरक्षण दिलं ते मंडल कमिशनला सोडून दिले. १८० जाती आरक्षणात होत्या आता साडेतीनशे-चारशे जाती झाल्या, त्याही भेसळ असतील मग घातलेल्या त्याच्यावरही आंबेडकर साहेबांनी बोलायला पाहिजे एक्सट्रा जाती कुठून आल्या. जास्तीचे जे आरक्षण घेतले ते पण उडायला पाहिजे ना मग. वरच दोन टक्के आरक्षण जायला पाहिजे ५० टक्क्यांच्या आतच आरक्षण मर्यादा राहायला पाहिजे. बोगस आरक्षण जे छगन भुजबळ घेत आहेत ते पण जायला पाहिजे ना. त्याच्यावर त्यांनी संविधानाला धरून बोलणं अपेक्षित आहे कारण ते न्याय सारखा करतात हा आमचा तरी समज आहे. त्यांना मी कायम मानतो पुढेही मानत राहणार आहे. मराठा समाज संपवावा किंवा त्यांना आरक्षण मिळू नये याबाबतीचे शब्द त्यांच्याकडून येऊ नये.त्यांच्याकडून सगळ्यांना सारखं बोलण्यात यावं, असे आवाहनही जरांगे यांनी यावेळी प्रकाश आंबेडकर यांना केले.
यात श्रीमंत मराठ्यांचा डावगरीब मराठ्यांना आरक्षण न देण्यास श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते, यावर जरांगे म्हणाले की, आम्ही पण तेच म्हणतो ना. ही गरिबांची लढाई आहे. गरीब मराठ्यांचे लेकर मोठे व्हावे हे ७० वर्षांत कोणत्याच पक्षातल्या नेत्यांना वाटलं नाही. श्रीमंत मराठा म्हणण्यापेक्षा जे सत्ताधारी होते जे राजकारणात होते यांच्या मनात गोरगरिबांना मोठे होऊ देऊ हे नव्हतं. म्हणून तर मी गरीब आहे, माझा समाज गरीब आहे. आम्ही गरिबांनीच ही लढाई उभा केली. श्रीमंत आपल्याला कधीच मोठं करणार नाही. म्हणून आमची लढाई आम्ही उभी केली आणि जिंकत आणली.
आरक्षण बचाव यात्राप्रकाश आंबेडकर यांनी काय करावे हे आम्ही कसं सांगू शकणार नाही. यात्रा काढा किंवा नका काढू मी मात्र माझ्या गरीब मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेणार म्हणजे घेणारच, असा जरांगे यांनी ठाम निश्चय व्यक्त केला.