छत्रपती संभाजीनगर : काही लोकांचा असा समज झाला आहे की ईडी, सीबीआय या संस्था राजकीय लोक चालवत आहेत. परंतु याचा जर वापर करायचा असता तर अनेक लोक तुरुंगात दिसले असते. बाहेर दिसलेच नसते. उदाहरण घ्यायचं झालं तर संजय राऊत हे भोंग्यासारखी बडबड करत आहेत. आमची इच्छा असती आणि एजन्सी जर तसं वागायला लागली असती तर संजय राऊत यांना अंडा सेलमध्येच टाकले असते, अशी जोरदार टीका शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर केली.
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीच्या संदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, तीन-चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली. ईडीची नोटीस येणे, नवीन भाग नाही. शरद पवार, राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांना देखील ईडीच्या नोटीस आल्या होत्या. त्या नोटीसला उत्तर देण्यासाठी हे नेते ईडी या कार्यालयात गेले होते. तसेच, या संदर्भात राज्यात एक नवीन पॅटर्न सुरू झाला आहे, एखाद्याला ईडीची नोटीस आली की तो शक्ती प्रदर्शन करतो. यातून एखाद्या संस्थेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे हे बरोबर नाही. ईडीची नोटीस आली म्हणजे शिक्षा होते असे नाही. त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली तर शिक्षा द्यायची की नाही हे कार्यालय ठरवतात. हे जर खरं असतं तर अनेक लोक तुरुंगात असते बाहेर दिसलेच नसते असे संजय शिरसाट म्हणाले.
परंतु काही लोकांचा असा समज झाला आहे की ईडी, सीबीआय या संस्था राजकीय लोक चालवत आहेत. परंतु याचा जर वापर करायचा असता तर अनेक लोक तुरुंगात दिसले असते. बाहेर दिसलेच नसते. उदाहरण घ्यायचं झालं तर संजय राऊत हे भोंग्यासारखी बडबड करत आहेत. आमची इच्छा असती आणि एजन्सी जर तसं वागायला लागली असती तर संजय राऊत यांना अंडा सेलमध्येच टाकले असते. परंतु तसं झालंय का आजही संजय राऊत बाहेर आहे. राज ठाकरे यांनी कार्यालयात जाऊन दहा तास नोटिसीला उत्तर दिलं यामुळे असं म्हणणं गैर आहे. असे करत राहिल्यास एखाद्या नेत्याने भ्रष्टाचार केला आहे, हे म्हणणे देखील आपल्याला शक्य होणार नाही, असेही संजय शिरसाट यांनी सांगितले.