शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
2
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
3
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
4
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
5
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
6
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
7
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
8
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
9
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
10
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
11
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
12
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
13
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
14
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
15
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
16
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
17
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
18
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
19
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
20
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान

वाघनखं खरी असतील तर पुरावे द्या; आदित्य ठाकरेंचे सरकारला आव्हान

By बापू सोळुंके | Published: October 01, 2023 6:42 PM

'बाळ हे माझ्या आजोबाचे नाव आहे. या बाळ आदूनेच त्यांना सळो की पळो करुन सोडले आहे.'

छत्रपती संभाजीनगर: लंडनच्या संग्रहालयातील छत्रपती शिवरायांची वाघनखं पुढील तीन वर्षासाठी येथे आणण्यात येणार असल्याचे सांगितलं जात आहे, परंतु ही वाघ नखं खरी नसल्याचे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी म्हटलं. त्यांचीच री ओढत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ही वाघनखं खरी असतील तर त्याचा पुरावा द्या, शिवभक्तांच्या भावनांशी खेळू नका, असे आवाहन सरकारला दिले.

बाळ हे माझ्या आजोबाचे नाव

इंडियान टुर ऑपरेटर्स असोसिएशन राष्ट्रीय परिषदेनिमित्त ते शहरात आले असता त्यांनी चिकलठाणा विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते. वाघनखावरुन प्रतिक्रिया दिल्यानंतर विरोधकांकडून तुम्हाला बाळआदू म्हणून हिणवलं आहे, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, बाळ हे माझ्या आजोबाचे नाव आहे. या बाळ आदूने त्यांना सळो की पळो करुन सोडले आहे.

जनतेच्या भावनांशी खेळू नये

वाघनखांवरुन प्रश्न विचारल्यानंतर त्यांचा खोटेपणा लोकांसमोर आला आहे. शिवराय हे महाराष्ट्रासाठी दैवत आहेत. त्यांच्याशी संबंधित महत्वाची वस्तू महाराष्ट्रात येत असेल तर त्याचं मंदीर व्हावं आणि त्याचे जतन व्हावे, अशी शिवभक्तांची भावना आहे. मात्र शासनाने जनतेच्या भावनांशी खेळू नये. जे काय असेल ते लोकांच्या समोर स्पष्ट करावं, अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.

पर्यटन क्षेत्रात राेजगाराच्या मुबलक संधीदेशातील प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात कोणत्याना कोणत्या घटनांशी जोडला आहे. यामुळे देशात आदरतिथ्य आणि पर्यटन क्षेत्रात राेजगाराच्या मुबलक संधी आहे. म्हणूनच पर्यटन,हाॅस्पिटिली क्षेत्राला आपण मंत्री असताना इंडस्ट्रीचा दर्जा दिला होता,असे आदित्य ठाकरे यांनी पर्यटन परिषदेला संबोधित करताना नमूद केले.शिवाय हॉटेलसाठी लागणाऱ्या परवानग्या आणि ना हरकत प्रमाणपत्रही कमी केल्याचे त्यांनी सांगितले.

आदित्य नावाची त्यांच्या मनात भितीसिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहलयातील वाघाच्या बछड्याचे नामकरण करताना आदित्य नावाची चिठ्ठी निघाल्यानंतर ती चिठ्ठी वगळण्यात आल्याचे सांगण्यात आले हाेते. यामुळे आज मी त्या वाघाच्या बछड्याला जय महाराष्टं करायला आल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. आदित्य नावाची त्यांच्या मनात किती भिती असल्याने त्यांनी नाव बदलले असावे असे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्रात असे अनेक आदित्य आहेत

आदित्य ठाकरे यापूर्वी कधीही सिद्धार्थ उद्यानतील प्राणी संग्रहलयात गेले नव्हते. केवळ वाघाच्या बछड्याच्या नामकरणप्रसंगी त्यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने ते तेथे जात आहे. त्यांचे एकट्याचेच नाव आदित्य आहे का, महाराष्ट्रात आदित्य नावाचे कित्येक जण आहे, त्याचे नाव बछड्याला दिलेले आहे-संदीपान भुमरे, पालकमंत्री संदीपान भुमरे,

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेAurangabadऔरंगाबादShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजState Governmentराज्य सरकार