याबाबत जायकवाडीचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांना निवेदन दिले आहे. जायकवाडी धरणाची चारी क्रमांक एक पैठण शिवारात असून, चारीवर ९४८ हेक्टर सिंचन होते. चारीची पाईपलाईन नादुरुस्त झाल्याने १० वर्षांपासून लाभक्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. विशेष म्हणजे जमीन कमांड एरिया कायद्याखाली येत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अतिरिक्त असलेल्या जमिनी संपादित करून धरणग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यात आल्या आहेत. जमीन काढून घेत कमांड एरिया घोषित करीत शेतातून चारी गेली; परंतु पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. जायकवाडी धरण १०० टक्के भरलेले असल्याने तांत्रिक अडचणी दूर करून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
पाणी न मिळाल्यास रास्ता रोको करणार
By | Published: December 02, 2020 4:11 AM