- सचिन लहानेछत्रपती संभाजीनगर : मोबाइल आता प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे; पण वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे जिवावर बेतू शकते. ही बाब सर्वश्रुत असल्याने मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे गुन्हा ठरविण्यात आला आहे. यामुळेच आम्ही म्हणतो, जीव वाचला तर मोबाइलवर पुन्हादेखील बोलता येईल.
दंड परवडणारा नाही भाऊवाहन चालविताना मोबाइलवर बोलताना वाहतूक शाखेच्या अथवा आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडले तर त्यांच्याकडून वाहनचालकाला एक हजार रुपये दंड ठोठावला जातो. हा दंड कोणालाही परवडणारा नसतो. यामुळे प्रत्येकाने वाहतूक नियमाचे पालन केले पाहिजे.
वाहतूक पोलिस अधिकारी काय म्हणतात?वाहन चालविताना मोबाइलवर बोलत असाल तर तुमचे लक्ष विचलित होते. यामुळे अपघात होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन मोटार वाहन कायद्यात वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या चालकावर दंडात्मक कारवाई केली जाते. आजकाल हेडफोन कानाला लावून वाहनचालक मोबाइलवर बोलत असतात. हेसुद्धा चुकीचे आहे.- प्रमोद कठाने, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा.