औरंगाबाद : बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. मात्र, स्पर्धेच्या जमान्यात बाजार समित्यांना टिकायचे असेल तर पारदर्शक कारभार करावा लागेल असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला. ते जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकास कामाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलतांना म्हणाले की, सध्याचे सरकार बाजार समिती नष्ट करायला निघाले आहे असा आरोप आमच्यावर होत आहे. पण आमचे म्हणणे असे आहे की बाजार समिती टिकल्या तर शेतकरी जिवंत राहील. तसेच बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. यामुळे स्पर्धेच्या जमान्यात बाजार समित्यांना टिकायचे असेल तर त्यांनी पारदर्शक कारभार करावा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विभागागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, आमदार अतुल सावे, इम्प्तीयाज जलील, डॉ. भागवत कराड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी केले.