शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

देशभक्तीच्या ज्वरात जगण्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष : सुरेंद्र जोंधळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 7:06 PM

सध्या देशभक्तीच्या ज्वरात नागरिक आकंठ बुडाले आहेत.

औरंगाबाद : नागरिक स्वतंत्रपणे विचार करीत स्वविवेक जागृत ठेवून जोपर्यंत निवडणुकांमध्ये सहभागी होत नाहीत. तोपर्यंत सक्षम आणि खरीखुरी लोकशाही अस्तित्वात येणार नाही. सध्या देशभक्तीच्या ज्वरात नागरिक आकंठ बुडाले आहेत. त्यामुळे जगणे, नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत मुंबईतील राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. सुरेंद्र जोंधळे यांनी व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागातर्फे ‘निवडणुका आणि भारतीय लोकशाही’ या विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर डॉ. सुरेंद्र जोंधळे, विभागप्रमुख डॉ. प्रशांत आमृतकर, डॉ. शुजा शाकीर उपस्थित होते. यावेळी डॉ. जोंधळे यांचे बीजभाषण झाले. लोकशाहीत लोकसहभागाला खूप महत्त्व असते.

जनकल्याणकारी राज्य ही संकल्पना घेऊन सत्तेवर येणारी सरकारे जाऊन आता फक्त कार्यकारी सरकारे सत्तेवर येत आहेत. आज देशात ज्या पायांवर लोकशाहीचा डोलारा उभा आहे. अशा संस्था धोक्यात आणण्याचे काम जाणीवपूर्वक घडवून आणले जात आहे. लोकशाहीत निवडणुका महत्त्वाच्या असतात. याच माध्यमातून सत्ताबदल होतात. सद्य:स्थितीत राष्ट्रीय पक्षसुद्धा जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून निवडणुका लढवताना दिसत आहेत. हे धोक्याचे लक्षण असल्याचेही डॉ. जोंधळे यांनी सांगितले. 

अध्यक्षीय समारोप डॉ. अशोक तेजनकर यांनी केला. प्रास्ताविक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शुजा शाकीर यांनी केले, तर आभार प्रा. मुख्तार शेख यांनी मानले. उद्घाटनानंतर ‘निवडणुका सुधारणा’ यावर पहिले सत्र पार पडले. यात अध्यक्ष म्हणून प्रा. मृदुल निळे, तर प्रा. साकेत आंबेरखान यांनी सहभाग नोंदवला. दुसरे सत्र ‘प्रसारमाध्यमे आणि राजकारण’ यावर झाले. यात अध्यक्षस्थानी प्रा. जयदेव डोळे होते, तर राहुल रानाळकर, सुभाष बोर्डे यांनी सहभाग नोंदवला. पहिल्या दिवशीचे शेवटचे सत्र ‘धर्म आणि जातीचे राजकारण : मतदान वर्तणूक’ या विषयावर पार पडले. यात अध्यक्षस्थानी प्रा. जहीर अली होते, तर प्रा. प्रकाश पवार व प्रा. श्रीराम येरनकर यांनी सहभाग नोंदवला.

लोकशाहीने निवडून येऊन बनतात हुकूमशहानिवडणुकांमध्ये मूलभूत प्रश्नांना बगल देऊन निष्क्रिय मुद्यांवर जेव्हा निवडणुका प्रभावित केल्या जातात. तेव्हा लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे हुकूमशाही स्थापन करतात. त्याचे जागतिक अनुभव अनेक असल्याचे डॉ. जोंधळे यांनी सांगितले. असे होऊ नये, यासाठी सजग नागरिकांनी स्वत:च्या पातळीवर लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन डॉ. जोंधळे यांनी केले. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणProfessorप्राध्यापक