शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
4
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
5
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
6
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
7
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
8
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
9
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
10
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
11
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
13
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
14
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
15
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
16
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
17
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
18
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
19
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
20
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...

अवैध गौण खणिज वाहतुकीकडे दुर्लक्ष करणे भोवले; तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 6:16 PM

उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांचा दणका.

पैठण: गौण खणिज अवैध वाहतूक कारवाई बाबत निष्काळजीपणा करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रशासकीय कारवाई का प्रस्तावीत करू नये ? या बाबत चोवीस तासाच्या आत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. उपविभागीय अधिकारी यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने गौण खणिज तस्करांना जाणूनबुजून अभय देणाऱ्या पैठण तहसीलच्या कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे. 

उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांनी दि २ रोजी ढोरकीन परिसरात अवैध वाळू करीत असलेल्या ट्रक्टरवर कारवाई केली. त्यानंतर ढोरकीनचे मंडळ अधिकारी सीमा भोसले, तलाठी दिलीप बावस्कर व कोतवाल रंजित नवले यांना कारणे  दाखवा नोटीस बजावली. अवैध उत्खनन व वाहतूकीबाबत मंडळ अधिकारी व तलाठी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ढोरकीन परिसरात मोठ्या प्रमाणात गौणखणिजाची चोरी होत असल्याचे नोटिसमध्ये म्हटले आहे. वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन न करता निष्काळजीपणाची भूमिका घेतल्याने महाराष्ट्र नागरी सेवा  ( शिस्त व अपील) १९७९ नुसार शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येवू नये? या बाबत खुलासा करावा असे उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांनी नमूद केले आहे.

१ एप्रिल पासून केलेल्या कारवाईचा अहलाल सादर करादरम्यान, तालुक्यात होत असलेल्या गौण खणिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीकडे महसूलच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. उपविभाग अधिकारी सोहम वायाळ यांनी तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठी यांना १ एप्रिलपासून आजपर्यंत केलेल्या गौण खणिज प्रतिबंधात्मक कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरमहा दिलेले कारवाईचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलेले नसल्याने संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यात खळबळ उडाली आहे.

तस्कर गायबउपविभागीय अधिकारी वायाळ यांनी अवैध गौण खणिजाबाबत घेतलेल्या कडक भूमिकेमुळे शुक्रवारी बहुतेक तलाठी कारवाईसाठी रस्त्यावर उतरले होते. मात्र, प्रशासनाच्या कारवाईचे संकेत मिळाल्याने शुक्रवारी वाळू व मुरूम तस्कर गायब झाल्याची चर्चा होत होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग