लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मागील काही महिन्यांपासून महापालिकेतील सर्वसाधारण सभेत बेकायदेशीर निर्णय घेण्यात येत आहेत. ६ जानेवारी रोजी एमआयएमच्या पाच नगरसेवकांना अपात्र करण्याचा ठराव घेण्यात आला. नियमानुसार अशी कारवाई करता येत नाही. उलट महापौरांनी चुकीचा निर्णय घेतल्याने त्यांच्यावरच कारवाई करावी, अशी मागणी आज एमआयएमतर्फे विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली.आ. इम्तियाज जलील यांच्यासह नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद केले आहे की, मागील वर्षभरात सर्वसाधारण सभेत अनेक ऐनवेळीचे ठराव मंजूर करण्यात आले. नियमानुसार असे करता येतनाही.सभागृहासमोर ठराव ठेवून ते मंजूर करायला हवेत. ६ जानेवारी रोजी एमआयएम नगरसेवकांना अपात्र करण्याचा ठराव घेण्यात आला. एमआयएम नगरसेवक अतिक्रमण हटावच्या कारवाईत मनपा अधिकाºयांना मदत करायला गेले होते. उलट आमच्यावर कारवाई करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही जलील यांनी उपस्थित केला.
महापौरांकडून बेकायदेशीर निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:52 AM