शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

गौण खनिजचे अवैधरीत्या उत्खनन; जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिसांना तहसीलदारांकडून केराची टोपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 13:16 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात माफियांद्वारे वाळू, मुरूम, दगडाचे अवैधरीत्या उत्खनन केले जाते. यामुळे नद्यांची चाळणी झाली तर डोंगर भुईसपाट झाले.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात गौण खनिजचे अवैधरीत्या उत्खनन आणि वाहतूक होत असूनही कारवाया होत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यास आठवडा उलटला तरी एकाही तहसीलदाराने खुलासा सादर केला नाही. तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यात माफियांद्वारे वाळू, मुरूम, दगडाचे अवैधरीत्या उत्खनन केले जाते. यामुळे नद्यांची चाळणी झाली तर डोंगर भुईसपाट झाले. अवैध स्टोन क्रेशरमुळे दगडखाणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या सर्वांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदारांना शस्त्रधारी सुरक्षा रक्षकही देण्यात आले आहेत. परंतु तहसीलदारांकडून कारवाईच होत नसल्याने शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ९ ऑगस्ट रोजी सर्व तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली. २ दिवसांत खुलासा करावा, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला होता. यास आठवडा झाला तरी एकाही तहसीलदाराने नोटीसवर स्पष्टीकरण दिले नाही.

बैठकीत दिली होती खोटी माहितीगेल्या महिन्यातील बैठकीला तहसीलदारांनी कुठेही गौण खनिजचे अवैध उत्खनन सुरू नाही. अवैध स्टोन क्रेशर सुरू नसल्याची माहिती दिली होती. बैठकीनंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी चितेगाव परिसरात कारवाई करीत पाच अवैध स्टोन क्रेशर सील केले. पैठण तालुक्यातील कावसान येथील अवैध वाळू उत्खनन करणारी सात वाहने पकडली. तर बाबा पेट्रोल पंप भागात ११ वाहने पकडली. यावरून तहसीलदारांनी खोटी माहिती सादर केल्याचे स्पष्ट झाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाsandवाळू