छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रदिनानिमित्त सर्वत्र 'ड्राय डे' असतानाही अवैधपणे देशी, विदेशी मद्याची विक्री करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे शाखा, अवैध मद्य विक्री विरोधी पथकाने छापेमारी मोठ्या प्रमाणात दारूचा साठा पकडला. या प्रकरणी संबंधित ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
अवैध मद्य विक्री विरोधी पथकाने राजू जाधव (रा. बजरंगनगर), सुनील रामभाऊ डुकळे यांच्या राहत्या घरातून देशी व विदेशी दारूच्या ८५८ बाटल्या जप्त केल्या. त्यामध्ये देशी दारुचे १३ बॉक्स, टॅन्गो पंचचे दोन बॉक्स, विदेशी रॉयल स्टॅगच्या ५२ बाटल्या. इम्पेरियल ब्लुचा १ बॉक्स असा एकुण १८ बॉक्स दारूचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणात आरोपीच्या विरोधात मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदवला. ही कारवाई निरीक्षक आघाव यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गजानन सोनटक्के, रमाकांत पटारे, हवालदार मनोज चव्हाण, महेश उगले, प्रकाश चव्हाण, नितेश सुंदर्डे, जालिंदर रंधे, आरती कुसळे यांच्या पथकाने केली.