राजूर : भोकरदन तालुका महसूल विभागाने आज दि.१४ रोजी अवैध वाळू वाहतूकीच्या विरोधात मोहिम हाती घेवून केदारखेडा राजूर रस्त्यावर दोन चोरटया वाळू वाहतुकीच्या ट्रकसह १३ लाख २४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून दोन जणांना अटक करण्यात आली. महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ.एन.आर.शेळके, तहसिलदार रूपा चित्रक यांच्या पथकाने वाळू पट्टयासह भोकरदन राजूर मार्गावर गस्त मोहिम राबवली. यामधे बाणेगांव पाटीजवळ दोन वाळू भरलेले ट्रक आढळून आले.त्यांच्याकडे पावतीची चौकशी केली असता, मिेळून आली नाही तसेच एका पावतीवर खाडाखोड केलेले निदर्शनास आले. दुसऱ्या ठिकाणी आढळलेला एक ट्रक (एम.एच.१५-४४६७) हा फरार होण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी ट्रक चालक व मालक मोतीराम रामकीसन टेटवाल, विठ्ठल चिपटे यांच्यासह तिघे फरार यांच्या विरूध्द राजूर पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार एच.एस.बहूरे, बी.बी.तूपे, मदन सुर्यवंशी हे करीत आहे. (वार्ताहर)
अवैध वाळू वाहतूक; दोघांना अटक
By admin | Published: June 16, 2014 12:13 AM