औरंगाबाद : सोमवार... पहाटे सव्वापाच वाजेची वेळ.. पोलीस नियंत्रण कक्षाचा फोन खणाणला... हॅलो... हॅलाे... मी अतिरेकी बोलतोय.... औरंगाबाद रेल्वेस्टेशन परिसरात मी बॉम्ब ठेवला आहे.... आणि फोन कट झाला. हे ऐकताच पोलीस नियंत्रण कक्षातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले.. आणि एकच धावपळ करत सगळा फौजफाटा अवघ्या काही मिनिटांत रेल्वेस्टेशन परिसराची कसून तपासणी करण्यास सज्ज झाला.
सोमवारी पहाटेच आलेल्या या निनावी फोनमुळे पोलीसांचे धाबे चांगलेच दणाणले होते. फोन येताच तात्काळ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रेल्वेस्टेशन परिसरात पोहोचले. रेल्वेस्टेशनची पार्किंग, पोलीस चौकी, सर्व प्लॅटफाॅर्म अशा सर्वच परिसराची एक ते दीड तास कसून तपासणी केली. मात्र कुठेही काहीही संशयास्पद सापडले नाही. त्यामुळे आता हा निनावी फोन कोणी केला, यामागे काय हेतू आहे, याविषयीही चौकशी पोलीस विभाग करत आहे.