शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

सरसकट प्लास्टिक बंदी शक्य की अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:16 AM

पर्यावरण संरक्षणांतर्गत प्लास्टिक वापरावर बंदी कायदा येत्या गुढीपाडव्यापासून राज्यात अमलात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त करण्याचा विडा राज्य सरकारने उचलल्याची घोषणा पालकमंत्री तथा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी येथे केली. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर आधीच बंदी आहे.

प्रशांत तेलवाडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पर्यावरण संरक्षणांतर्गत प्लास्टिक वापरावर बंदी कायदा येत्या गुढीपाडव्यापासून राज्यात अमलात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त करण्याचा विडा राज्य सरकारने उचलल्याची घोषणा पालकमंत्री तथा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी येथे केली. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर आधीच बंदी आहे. मात्र, आता संपूर्ण प्लास्टिक वापरावरच बंदी येणार काय, कॅरिबॅगसह सर्व प्लास्टिकच्या विक्रीवर व उत्पादनावरही बंदी येणार काय, प्लास्टिकला नवीन पर्याय सरकारने शोधून काढला काय, असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, १९९९ पासून केंद्र व राज्यस्तरावर प्लास्टिक नियंत्रणासाठी चार कायदे करण्यात आले, पण थातुरमातुर कारवाईपलीकडे काहीच साध्य झाले नाही. आता प्लास्टिक मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला असून, सध्या परिस्थिती काय आहे. सरसकट प्लास्टिक बंदी शक्य का, अशक्य याचा आमच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा.दररोज ५० ते ६० हजार बाटल्यांचा खचप्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी विक्री होण्याचे प्रमाण मागील २० वर्षांत झपाट्याने वाढले आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार या क्षेत्रात २८ कंपन्या आहेत. त्याद्वारे दररोज ५० ते ६० हजार बाटलीबंद पाण्याची विक्री होत असते. या बाटल्या रिकाम्या झाल्यावर त्या कचºयामध्ये फेकून देण्यात येतात. यातील निम्म्या बाटल्या कचरावेचक उचलतात, पण निम्म्या बाटल्या रस्त्यात पडून असतात.दररोज २०० मेट्रिक टन प्लास्टिकचा कचरामहानगरपालिका हद्दीतून दररोज ६५० मेट्रिक टन कचरा उचलला जातो. यातील २०० मेट्रिक टन निव्वळ प्लास्टिकचा कचरा असतो. यात विघटन न होणाºया कॅरिबॅगचे प्रमाण सर्वाधिक असते. एवढ्या मोठ्या प्रमाणात जमा होणाºया प्लास्टिकच्या कचºयाची विल्हेवाट कशी लावायची, असा यक्षप्रश्न महानगरपालिकेला पडला आहे.प्लास्टिकमुक्त महाराष्ट्र हा राज्य सरकारचा निर्णय व्यापाºयांना मान्य आहे. पण त्यासाठी फक्त व्यापाºयांना प्लास्टिक विक्रीस बंदी घालण्यापेक्षा थेट ज्यापासून प्लास्टिक तयार होते, त्या प्लास्टिक दाणे उत्पादनावर बंदी घालण्यात यावी. तसेच प्लास्टिक बंदी करण्याआधी सरकारने त्यावर पर्याय शोधून काढावा. तसेच प्लास्टिक विक्रेत्यांना त्यांच्याकडील संपूर्ण माल विक्रीसाठी सरकारने ठराविक कालावधी देणे आवश्यक आहे किंवा सरकारने त्यांच्याकडील सर्व प्लास्टिक खरेदी करावे. कायद्याचा धाक दाखवून विक्रेत्यांना नाहक त्रास देऊ नये.अजय शहा, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघदररोज ४ टन प्लास्टिकची विक्रीशहरात औरंगाबादसह मुंबई, गुजरात येथून प्लास्टिक विक्रीला येते. सुमारे ३०० होलसेल विक्रेते व २०० फेरीवाल्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या ४ टन प्लास्टिकची दररोज विक्री होते. यात पॅकिंग बॅग, किराणा बॅग, कॅरिबॅग, दूध पॅकिंग, शॉपिंग बॅग, असे प्रकार आहेत. त्यातही २० प्रकारच्या कॅरिबॅग व पॅकेजिंगमध्ये २४० प्रकार उपलब्ध आहेत. ४ टनपैकी २ टन कॅरिबॅग विकल्या जातात. यावरून प्लास्टिक व्यवसायाची व्याप्ती लक्षात येते.शहरात लवकरच प्लास्टिक बंदीप्लास्टिक बंदीची लवकरच अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. शासनस्तरावर यावर मसुदा तयार करण्याचे काम सुरू आहे. शहरात पूर्वीप्रमाणे पुन्हा ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. दोन वर्षांपूर्वी महापालिकेने व्यापक प्रमाणात कारवाईचा बडगा उगारून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली होती. पुन्हा एकदा अशाच पद्धतीने कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिली.शहरातील हातगाड्या, किराणा दुकान आणि अन्य छोट्या-मोठ्या दुकानांमध्ये राजरोसपणे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर सुरू आहे. कॅरिबॅगमुळे शहरात सर्वात जास्त त्रास महापालिकेला सहन करावा लागतो. कमी जाडीच्या प्लास्टिकवर प्रक्रिया करण्याची कोणतीही प्रक्रिया मनपाकडे नाही. ९९ टक्के नागरिक या कॅरिबॅग कचºयात फेकून देतात. महापालिका शहरातील संपूर्ण कचरा नारेगाव कचरा डेपोवर नेऊन टाकत आहेत. कॅरिबॅगचे विघटनही होत नाही. पर्यावरणासाठी कॅरिबॅग अत्यत घातक आहेत.शहरातील अनेक नागरिक कचरा नाल्यांमध्ये आणून टाकतात. कॅरिबॅगमुळे शहरातील नाल्यांमध्ये कॅरिबॅगच दिसून येतात. मोठा पाऊस झाल्यास पावसाच्या पाण्याला नैसर्गिक स्रोतही मिळत नाही. अनेकदा सखल भागातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकारही झाले आहेत. पालकमंत्री रामदास कदम यांनी दोन दिवसांपूर्वीच शासकीय कार्यालयांमध्ये प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी घालावी, असे आदेश दिले. त्यानंतर आता हळूहळू कॅरिबॅगवरही पूर्णपणे बंदी आणण्यात येणार आहे. महापालिका पुन्हा एकदा कारवाई करणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त भालसिंग यांनी सांगितले.प्लास्टिकचे दुष्परिणामप्लास्टिकचे विघटन होत नाही.प्लास्टिकचा कचरा मोठी समस्या.प्लास्टिकचा कचरा अडकून नाले, गटारी तुंबणे.विहिरीत, नदीत प्लास्टिक कचºयामुळे पाणी प्रदूषण.जनावरांच्या पोटात प्लास्टिकचा विळखा.