औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलात सुधारणा व्हावी यासाठी येथील क्रीडा अधिकारी कसून प्रयत्न करीत असले तरी अद्यापही सुधारणेला वाव असल्याचे मत मुख्यालयातील क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे यांनी याआधीही विभागीय क्रीडा संकुलाची पाहणी केली होती. त्या वेळेस त्यांनी अनेक सूचना केल्या होत्या; परंतु त्यापैकी काही कामे झाली आहेत. तथापि, काही काम न झाल्यामुळे आपण पूर्णपणे समाधानी नसल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याचे नियोजन करण्यास आपण बजावले होते; परंतु तसे झाले नाही. इलेक्ट्रिकविषयीचे कामही तसेच बाकी आहे, तसेच क्रीडा प्रबोधिनीच्या वसतिगृहात सुधारणा होणे आवश्यक आहे. तिची रंगरंगोटी व्हावी, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने व आरोग्यदायी वातावरण राहावे यादृष्टीने विभागीय क्रीडा संकुल समितीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. विभागीय क्रीडा संकुलात तीन बोअर आहेत. त्यांचे नियोजन करणे आवश्यक आहे. तसे झाल्यास मुख्य मैदानाला पाणी देणे शक्य होईल, तसेच पिण्याअयोग्य पाण्याचाही मैदानावर पाणी टाकण्यास उपयोग करता येईल, असे ते म्हणाले.सिंथेटिक ट्रॅक, अॅस्ट्रो टर्फसाठी पाठपुरावाविभागीय क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅक आणि अॅस्ट्रो टर्फसाठी राज्य शासनातर्फे पाठपुरावा सुरू आहे. या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यताही मिळाली आहे, तसेच सिंथेटिक ट्रॅकला ६ कोटी व हॉकी अॅस्ट्रो टर्फला ५.५ कोटी रुपयांचा निधीही मान्य झाला असून, या विषयाची फाईल वित्त विभागाकडे पाठविण्यात आली असल्याची माहितीही सुधीर मोरे यांनी दिली. त्याचप्रमाणे सूतगिरणीच्या दोन एकर जागेवर स्विमिंगपूल उभारण्याचे विभागीय क्रीडा संकुल समितीचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.शासनातर्फे मैदानाच्या देखरेखीसाठी मिळणार नाही आर्थिक साह्यराज्य क्रीडा विभागातर्फे विभागीय क्रीडा संकुलाला सुरुवातीच्या ३ वर्षांपर्यंत देखरेखीसाठी आर्थिक साह्य केले जाते. त्यानंतर मात्र हा खर्च त्यांना मिळणाºया उत्पन्नातून करावा लागतो, अशी माहितीही त्यांनी दिली.तत्पूर्वी, क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे यांनी क्रीडा प्रबोधिनीच्या मुले आणि मुलींच्या वसतिगृहाला भेट देताना अनेक सूचना केल्या.सुधीर मोरे यांनी मुले व मुलींच्या क्रीडा प्रबोधिनीच्या परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची मुख्य सूचना केली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, सुनील वानखेडे उपस्थित होते.
विभागीय क्रीडा संकुलात सुधारणेला अजूनही वाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 12:46 AM
विभागीय क्रीडा संकुलात सुधारणा व्हावी यासाठी येथील क्रीडा अधिकारी कसून प्रयत्न करीत असले तरी अद्यापही सुधारणेला वाव असल्याचे मत मुख्यालयातील क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे यांनी याआधीही विभागीय क्रीडा संकुलाची पाहणी केली होती.
ठळक मुद्देक्रीडा उपसंचालक सुधीर मोरे : अनेक कामे न झाल्याने अद्याप पूर्ण समाधानी नाही