छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ७,५०,२५४ ग्राहकांकडे ११९ कोटी रुपये वीजबिल थकीत आहे. वीजबिलांचा नियमित भरणा होत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती बिकट आहे. दीड हजाराच्या जवळपास थकबाकीदारांची वीज तोडली. वीज ग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
२० दिवसांत ५४ कोटींची वसुलीमार्च एण्डच्या पार्श्वभूमीवर ९८ कोटींचे लक्ष्य देण्यात आले होते. महावितरणने या २० दिवसांत त्यापैकी ५४ कोटी आतापर्यंत वसुली केली आहे.
११९.२ कोटींची थकबाकीछत्रपती संभाजीनगर जिल्हा ७,५०,२५४ ग्राहकांकडे ११९.२ कोटी रुपये थकबाकी आहे. वसुलीचे काम जोरात सुरू आहे. त्यासाठी २० सेक्शनमध्ये प्रत्येकी पाच पथके कामाला लागली आहेत.
उन्हाळ्याचा परिणामउन्हाळ्याच्या झळा वाढल्या. मोहीम जोरदार सुरू आहे. वीज कनेक्शन तोडले की उन्हाळा असह्य होत असल्याने संबंधित पटकन वीजबिल भरत आहेत. बिल भरल्यानंतर त्वरित कनेक्शन जोडण्यात येत आहे.
वीज चोरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखलवीज चोरून आकडे टाकून वीज वापरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. हजारो कनेक्शन चोरीचे आढळून आले असून, त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे. अनेकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत.
३१ मार्चपूर्वी भरा थकबाकीसध्या सुरू असलेल्या महावितरणच्या धडक मोहिमेमध्ये वीजपुरवठा खंडित केलेल्या थकबाकीदारांच्या वीज जोडणीची स्वतंत्र पथकाद्वारे तपासणी सुरू आहे. थकबाकीदार शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणांहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/ १३८ नुसार कारवाई करण्यात येत आहे. ३१ मार्चपूर्वी वीजबिल भरा अन् अंधार टाळावा.- शांतीलाल चौधरी, अधीक्षक अभियंता, महावितरण.