छत्रपती संभाजीनगर : २०१९ साली औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना औरंगाबाद पूर्व आणि मध्य या दोन विधानसभा मतदारसंघात मोठा दणका बसल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता पुन्हा एकदा उद्धवसेनेकडून उमेदवारी मिळालेल्या खैरे यांच्यासमोर या दोन मतदारसंघातून एमआयएमची आघाडी मोडून काढण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
२०१९ साली औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी औरंगाबाद मध्यमध्ये खैरे यांना जलील यांनी धोबीपछाड दिली. जलील यांना या मतदारसंघात ९९ हजार ४५० इतकी मते मिळाली तर खैरे यांना केवळ ५० हजार ३२७ मते मिळाली. जलील यांना जवळपास दुप्पट मते मिळाली. या मतदारसंघात मिळालेल्या कमी मतांमुळे खैरे यांचा पराभव झाला. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव (३०,२१०), काँग्रेसचे सुभाष झांबड (१४,१५५) आणि चंद्रकांत खैरे या तिघांना मिळालेल्या मतांपेक्षा जलील यांना १६ हजार ५५ मते अधिक मिळाली. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातही जलील यांना ९२ हजार ३४७ इतकी तर खैरे यांना ५५ हजार ४१७ मते मिळाली. वैजापूर, कन्नड, गंगापूर आणि औरंगाबाद पश्चिम या चार मतदारसंघात खैरे यांना जलील यांच्यापेक्षा अधिक मते मिळाली. जलील हे केवळ ५०२५ मतांनी निवडून आले. मात्र, औरंगाबाद मध्यने खैरेंना मोठा फटका दिला. शहरातील औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाने मात्र खैरे यांना जलील यांच्यापेक्षा ६०३५ मते अधिक दिली.
खैरे यांचा प्रभावचंद्रकांत खैरे यांना औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक ७७ हजार २७४ मते मिळाली. त्याखालोखाल कन्नड मतदारसंघात ७३ हजार ९८८ मते मिळाली. हर्षवर्धन जाधव हे कन्नडचे माजी आमदार असूनदेखील या विधानसभा मतदारसंघात खैरे यांना जाधव यांच्यापेक्षा ४६१४ मते अधिक मिळाली. वैजापूरमध्येही खैरे यांना आघाडी मिळाली.
जाधव एका मतदारसंघात आघाडीवरहर्षवर्धन जाधव यांना सर्वाधिक मते ही कन्नडमध्ये न मिळता गंगापूर विधानसभा मतदासंघात मिळाली. तिथे ते खैरे आणि जलील यांच्यापेक्षा पुढे राहिले. गंगापूरमध्ये हर्षवर्धन जाधव (६४,३९३) खैरे (६०,०८२) आणि जलील (५६०२३) असे चित्र राहिले.
२०१९ ची स्थितीइम्तियाज जलील (एमआयएम)- ३,८८,७८४चंद्रकांत खैरे (शिवसेना) - ३,८३,७५९हर्षवर्धन जाधव (अपक्ष) - २,८३,२३७सुभाष झांबड (काँग्रेस) - ९१,६८८इम्तियाज जलील ५०२५ मतांनी विजयी.
२०१९ मधील निवडणुकीचा निकाल (विधानसभा मतदारसंघनिहाय)विधानसभा एमआयएम शिवसेना अपक्ष काँग्रेस एकूण मतेइम्तियाज जलील - चंद्रकांत खैरे - हर्षवर्धन जाधव - सुभाष झांबड--------------------------------------------------------------------------------------कन्नड ३४२६३ ७३९८८ ६९३७४ १११८५ २०१६४१
औरंगाबाद ९९४५० ५०३२७ ३०२१० १४१५५ १९८०६९मध्य
औरंगाबाद ७१२३९ ७७२७४ ३८०८७ १५५९५ २०७३८८
पश्चिमऔरंगाबाद ९२३४७ ५५४१७ २५६१९ १४०९६ १९१४६६पूर्व
गंगापूर ५६०२३ ६००८२ ६४३९३ १२७८१ २०२८२८
वैजापूर ३५४६२ ६६६७१ ५५५५४ २३८७६ १९०१३८
एकूण ३८८७८४ ३८३७५९ २८३२३७ ९१६८८ ११,९१५३०